पंजाब प्रांतात आढळले 10 दहशतवादी, भारतात येण्यासाठी आखतायेत नवा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 15:04 IST2018-12-29T15:03:33+5:302018-12-29T15:04:37+5:30
मल्टी एजन्सी कुआर्डीनेशन (MCA) अहवालानुसार, पाकिस्तानमधील शखरगढ बल्क प्रदेशात 10-15 दहशवादी दिसूनआले.

पंजाब प्रांतात आढळले 10 दहशतवादी, भारतात येण्यासाठी आखतायेत नवा प्लॅन
श्रीनगर - पाकिस्तानीदहशतवादी भारतात घुसकोरी करण्याच्या तयारीत आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. त्या बर्फवृष्टीचा आधार घेत पंजाबच्या सीमारेषेवरुन हे दशहतवादी भारतात येणार असल्याची गुप्तचर यंत्रणांची माहिती आहे. विशेष म्हणजे या दहशतवाद्यांनी भारतात एंट्री करण्यासाठी नवा मार्ग शोधला आहे.
मल्टी एजन्सी कुआर्डीनेशन (MCA) अहवालानुसार, पाकिस्तानमधील शखरगढ बल्क प्रदेशात 10-15 दहशवादी दिसून आल्याची माहिती आहे. हा प्रदेश पंजाब प्रांतापासून जवळच आहे. हे सर्व दहशतवादी भारतात घुसकोरी करण्याची योजना बनवत असल्याचे या अहवालातील माहितीवरुन समजते. त्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शकरगढ परिसरात आढळलेले हे सर्वच दहशतवादी सिव्हील ड्रेसमध्ये होते, अशीही माहिती आहे.
दरम्यान, निवृत्त लष्कर अधिकारी विनय भाटीया यांनी म्हटले की, सद्यस्थितीत पंजाब प्रांतातून किंवा सीमारेषेवरुन भारतात घुसकोरी करणे, दहशदवाद्यांसाठी सोपे नसून भारतीय लष्कराने मजबूत तटबंदी केली आहे.