२५० कोटींच्या ठेवीसाठी १० हजार अर्ज बीएचआर पतसंस्था : ७०९ मालमत्तांचे १०७ कोटींचे अवार्ड
By admin | Published: July 14, 2016 09:35 PM2016-07-14T21:35:13+5:302016-07-14T21:35:13+5:30
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेवर अवसायकांच्या नियुक्तीनंतर ठेवीदारांचा ठेवीसाठी तगादा सुरु झाला आहे. पतसंस्थेकडे १० हजार ठेवीदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या ठेवीदारांची सुमारे २५० कोटींची रक्कम देणे आहे. दरम्यान,लवादकाच्या नियुक्तीनंतर ७०६ मालमत्तांचे १०७ कोटी रुपयांच्या रकमेचे अवार्ड करण्यात आले आहे.
Next
ज गाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेवर अवसायकांच्या नियुक्तीनंतर ठेवीदारांचा ठेवीसाठी तगादा सुरु झाला आहे. पतसंस्थेकडे १० हजार ठेवीदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या ठेवीदारांची सुमारे २५० कोटींची रक्कम देणे आहे. दरम्यान,लवादकाच्या नियुक्तीनंतर ७०६ मालमत्तांचे १०७ कोटी रुपयांच्या रकमेचे अवार्ड करण्यात आले आहे.बीएचआर पतसंस्थेवर अवसायक जितेंद्र कंडारे यांची ऑक्टोबर २०१५ मध्ये नियुक्ती झाली आहे. नियुक्तीला ९ महिन्यांचा कालावधी उलटला असताना ठेवीदारांना अद्याप एक रुपयादेखील मिळालेला नाही. त्यामुळे ठेवीदार हवालदिल झाले आहेत.१० हजार ठेवीदारांचे अर्जबीएचआर पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात ठेवीदारांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी तसेच तक्रार अर्ज घेण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी अवसायकांनी नियुक्त केले आहे. त्यानुसार जुलै महिन्यापर्यंत राज्यभरातील १० हजार ठेवीदारांचे अर्ज प्राप्त झाले आहे. या १० हजार ठेवीदारांचे सुमारे २५० कोटी रुपयांची रक्कम पतसंस्थेकडे घेणे आहे.ऑडिट झालेल्या शाखांमध्ये ६५० कोटींच्या ठेवीबीएचआर पतसंस्थेच्या १५० शाखांचे ऑडिट पूर्ण झाले आहे. तर १० शाखांचे ऑडिट हे अंतिम टप्प्यात आहे. १५० शाखांमध्ये तब्बल ६५० कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. तर सुमारे ५५० कोटी रुपयांची कर्जवाटप झालेली आहे. उर्वरित शाखांमधील ऑडिट पूर्ण झाल्यानंतर सर्व शाखांमधील एकूण ठेवी आणि कर्जाची रक्कम याचा ताळमेळ बसणार आहे.७०९ मालमत्तांचे १०७ कोटींचे अवार्डबीएचआर पतसंस्थेतून कर्ज घेऊन परतफेड न करणार्या कर्जदारांना लवादकांनी नोटीस काढल्या आहेत. त्यात ५५४ कर्जदारांकडील वसुलीसाठी अवार्डची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यानुसार वसुलीसाठी दरखास्त देण्यात आली आहे. १५२ कर्जदारांची अवार्डची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. एकुण ७०६ कर्जदारांच्या १०७ कोटी ३३ लाखांच्या मालमत्तांचे अवार्ड करण्यात आले आहे.आठ कोटींची वसुली तरी ठेवीदार उपाशीअवसायकांनी आतापर्यंत कर्जदारांकडून ८ कोटी रुपयांची कर्जवसुली केली आहे. तसेच वस्तू व मालमत्तांच्या विक्रीची निविदा काढली आहे. कर्जदारांकडून रकमेची वसुली होत असताना ठेवीदारांना मात्र ठेवी देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या रकमेतून वैद्यकीय उपचार, लग्न या कारणांना महत्त्व देत ठेवींचे वितरण केल्यास अनेकांना दिलासा मिळणार आहे. अवसायकांनी याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.