चीनहून निघालेली मालगाडी धावणार 10 हजार किमी!

By admin | Published: November 26, 2014 02:39 AM2014-11-26T02:39:58+5:302014-11-26T02:39:58+5:30

चीनच्या अतिपूव्रेकडील यिवु या औद्योगिक शहरातून अलीकडेच एक मालगाडी ऐतिहासिक आणि विश्वविक्रमी प्रवासासाठी रवाना झाली.

10 thousand kilometers to run from China | चीनहून निघालेली मालगाडी धावणार 10 हजार किमी!

चीनहून निघालेली मालगाडी धावणार 10 हजार किमी!

Next
बीजिंग : चीनच्या अतिपूव्रेकडील यिवु या औद्योगिक शहरातून अलीकडेच एक मालगाडी ऐतिहासिक आणि विश्वविक्रमी प्रवासासाठी रवाना झाली. ‘चायना-युरोप ब्लॉक ट्रेन’ या नावाने ओळखली जाणारी ही मालगाडी सलग 21 दिवसांचा प्रवास करून स्पेनची राजधानी माद्रिद येथे पोहोचेल. 1क् हजार किमीचा (सुमारे 6,2क्क् मैल) हा प्रवास आजवर कोणत्याही रेल्वेगाडीने सलगपणो केलेला सर्वाधिक लांब अंतराचा प्रवास असेल. रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे हा आजवरचा सर्वात लांब रेल्वेमार्ग होता. यिवु ते माद्रिद या रल्वेमार्ग त्याहून सुमारे 776 किमीने अधिक लांब आहे.
 या मालगाडीस प्रत्येकी एक कन्टेनर वाहून नेणा:या तब्बल 82 वाघिणी आहेत.  या महाकाय मालगाडीला 18 नोव्हेंबर रोजी यिवु रेल्वे फ्रेट स्टेशनवरून समारंभपूर्वक रवाना करण्यात आले. यिवु फ्रेट स्टेशन चीनच्या अगदी पूव्रेकडे असलेल्या ङोजिआंग प्रांतातील शिनहुआ शहरात आहे. यिवु हे चीनमधील छोटय़ा ग्राहकपयोगी वस्तू्च्या घाऊक व्यापारचे सर्वात मोठे केंद्र असून तेथे अनेक देशांमधील व्यापारी स्थायिक झालेले आहेत.
मालवाहतुकीसाठीचा हा सर्वाधिक लांबीचा रेल्वेमार्ग ट्रान्स-युरेशिया लॉजिस्टिक्सने तयार केला आहे. ही कंपनी जर्मनीतील दॉएच्च बाह्न एजी व रशियन रेल्वे यांचा संयुक्त प्रकल्प आहे. ही मालगाडी चीनमधून कझाकस्तान, रशिया, बेलारूस, पोलंड, जर्मनी आणि फ्रान्स असे आणखी सहा देश पार करून डिसेंबरमध्ये स्पेनची राजधानी माद्रिद येथे पोहोचेल. मालाच्या कन्टेनर्सची बव्हंशी आंतरराष्ट्रीय वाहतूक सागरी मार्गाने होते. परंतु चीनचा हा 1क् हजार किमी लांबीचा रेल्वेमार्ग म्हणजे जणू त्यांनी आपला माल युरोपमध्ये पोहोचविण्यासाठी शोधलेला नवा ‘सिल्क रूट’ आहे. मध्य युगात चीन अशाच खुष्कीच्या मार्गाने युरोपशी व्यापार करायचा. चीनने युरेशिया व युरोपमध्ये अधिक खोलवर आपला व्यापार पोहोचविण्यासाटी या व अशाच 4क् अब्ज डॉलर खर्चाच्या रेल्वेमार्गाचा धडाकेबाज कार्यक्रम हाती घेतला आहे. (वृत्तसंस्था)

 

Web Title: 10 thousand kilometers to run from China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.