दारु पिऊन गाडी चालवल्यास 10 हजारांचा दंड, मोटारवाहन सुधारणा विधेयक सादर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 20:52 IST2019-07-15T20:51:00+5:302019-07-15T20:52:54+5:30
नवी दिल्ली - गेल्या 5 वर्षात देशातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यास आम्ही कमी पडलो आहेत. त्यामुळे या विभागाची जबाबदारी ...

दारु पिऊन गाडी चालवल्यास 10 हजारांचा दंड, मोटारवाहन सुधारणा विधेयक सादर
नवी दिल्ली - गेल्या 5 वर्षात देशातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यास आम्ही कमी पडलो आहेत. त्यामुळे या विभागाची जबाबदारी माझी असून मी ती स्विकारत असल्याचे सांगत केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत मोटारवाहन संसोधन विधेयक सादर केले. यापूर्वीच लोकसभेत हे विधेयक संमत झाले होते. मात्र, राज्यसभेत विधेयकास मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे, राजस्थानचे तत्कालीन परिवहनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन करुन या विषयाचा अभ्यास केला. या समितीमध्ये 18 राज्यांचे परिवहनमंत्र्यांचा समावेश होता, असेही गडकरी यांनी सांगितले.
स्थायी समिती आणि संयुक्त प्रवर समितीसमोर हे विधेयक मांडण्यात आले आहे. तसेच, लोकसभेत नव्याने हे विधेयक मांडण्यात आले असून विधेयक पारित करण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे. तसेच, रस्ते अपघात थांबविण्यासाठी आणि लोकांचा जीव वाचावा म्हणून मोटार वाहन सुधारणा विधेयक मंजूर करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही नितीन गडकरी यांनी केले आहे.
मोटार वाहन सुधारणा विधेयकातील नियम
* दारु पिऊन गाडी चालवल्यास 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तर, जोरदारपणे वाहन चालवल्यास 1 हजार ऐवजी 5000 रुपयांचा दंड.
* ओव्हरडोलिंगवर 20 हजार रुपयांचा दंड, सीट बेल्ट न बांधल्यास 10 हजार रुपयांचा दंड
* विना पॉलिसी वाहन चालवल्यास 2 हजार रुपयांचा दंड
* विना हेल्मेट वाहन चालविल्यास 1000 रुपयांचा दंड आणि 3 महिन्यांसाठी वाहनपरवाना रद्द करण्याची तरतूद
* मोटार वाहन सुधारणा विधेयकात सुरक्षा नियमांसाठी कडक पाऊले उचलण्यात आली आहे. त्यामुळे, नियमांचे उल्लंघन केल्यास कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
संसद में मैंने सभी दलों से अपील की है कि सड़क दुर्घटनाएं रोकने और लोगों की जान बचाने के लिए मोटर व्हीकल अमेंडमेंट बिल पारित करने में सहयोग करें pic.twitter.com/YR28ZZLJYa
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) July 15, 2019