... त्यासाठी 'बॉर्डर'वर बोलावले 10 हजार सैनिक, 'अफवांवर विश्वास ठेवू नका'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 02:15 PM2019-02-24T14:15:34+5:302019-02-24T14:16:36+5:30
काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमधील 27 पेक्षा अधिक गावे खाली करण्यात आली आहेत.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीर सीमारेषवर मोठा तणाव निर्माण झाला आहे. तर, पाकिस्तानी रेंजर्स आणि दहशतवाद्यांकडून सीमारेषेवर कारवाया सुरूच आहेत. भारतीय सैन्याकडूनही पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्यात येत आहे. काश्मीरच्या काही भागांमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये निमलष्करी दलाच्या 100 तुकड्या पाठविण्यात येत असून सुमारे 10 हजार जवान तिथे तैनात करण्यात येत आहेत. त्यामुळे कुठलिही युद्धजन्य परिस्थिती नसून देशातील नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी यांनी केले आहे.
काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमधील 27 पेक्षा अधिक गावे खाली करण्यात आली आहेत. तसेच बॉर्डरवर निमलष्कर दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून 10 सैन्याचा ताफा काश्मीरच्या सीमारेषेवर सुरक्षा सीमारेषेवर पाकिस्तानी रेंजर्स आणि दहशतवाद्याकडून चकमकी सुरूच आहेत. बुधवारी आणि गुरूवारी सीमा रेषेवर झालेल्या गोळीबारांनंतर येथील गावांना खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या गावातील स्थलांतरीतांना आवश्यक ते सामान सोबत घेण्यास बजावले असून शाळा आणि सरकारी भवनांमध्ये आश्रय देण्यात येत आहे. पाकिस्तानी सीमारेषेपासून दूर असलेल्या ठिकाणी या गाववाल्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. एलओसीजवळी गावांना खाली करण्यासंदर्भात नोटीस जारी करण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे. मात्र, येथील गावकरी आपल्याच गावात राहण्यास उत्सुक असल्याचं राजौरी जिल्ह्याचे पोलीस उप-आयुक्त मोहम्मद एजाज असद यांनी गावचा दौरा केल्यानंतर म्हटले. मात्र, सुरक्ष जवानांकडून त्यांना सरकारी योजनांची माहिती देण्यात येत असून त्यांचे मन विळविण्यात येत असल्याचेही असद यांनी सांगितले.
J&K Raj Bhavan: Governor appealed to ppl that induction of forces be seen only in context of conducting elections. The Governor appealed to the people not to believe in rumours of any extreme nature which are circulating widely in some quarters and to remain calm. https://t.co/CUZpxnjX4n
— ANI (@ANI) February 24, 2019
दरम्यान, सध्या काश्मीरमधील काही भागांत निवडणुका होत आहेत. त्यासाठी सैन्याची अतिरिक्त कुमक काश्मीरच्या सीमाभागात मागविण्यात आली आहे. त्यामुळे काश्मीरमधील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच देशातील सर्वच नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन राज्यपाल मलिक यांनी केले आहे. तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असेही मलिक यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पाकिस्ताननेही सीमेवरील गावे अन्यत्र हलविण्याचा निर्णय घेतला असून, त्या ठिकाणी लष्करातर्फे बंकर उभारण्याची सुरुवातही केली आहे. भारतातर्फे पाकिस्तानवर हल्ला होईल, अशी भीती त्या देशात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमधील सभेत म्हणाले की, पुलवामाचा बदला कसा घ्यायचा, हे लष्कराला माहीत आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर 100 तासांच्या आत हल्ल्याला मदत करणाऱ्यांना जिथे पाठविणे गरजेचे होते, तेथे जवानांनी धाडले आहे. लष्कराला सरकारने पूर्ण मोकळीक दिली आहे. पाकिस्तानविरोधी लढ्याचे सारे मार्ग आम्ही खुले ठेवल्याचे अर्थमंत्री जेटली यांनीही नमूद केले होते.
#JammuAndKashmir Raj Bhavan: On the medicine front also, the instructions to hospitals to increase availability of medicines is also to be seen in the context of shortage of supplies as a result of the prolonged disruption in transport. https://t.co/IHcHS4saIw
— ANI (@ANI) February 24, 2019