१० केंद्रीय मंत्र्यांच्या मालमत्तेमध्ये घट !
By admin | Published: January 15, 2017 04:56 AM2017-01-15T04:56:49+5:302017-01-15T04:56:49+5:30
नरेंद्र मोदी यांनी ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ अशी घोषणा दिल्याचे सर्वांनाच आठवत असेल. आता तसेच घडत आहे. वर्षभरात पंतप्रधान, नितीन गडकरी, सुरेश प्रभू यांच्यासह १0 मंत्र्यांची
- हरीश गुप्ता, नवी दिल्ली
नरेंद्र मोदी यांनी ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ अशी घोषणा दिल्याचे सर्वांनाच आठवत असेल. आता तसेच घडत आहे. वर्षभरात पंतप्रधान, नितीन गडकरी, सुरेश प्रभू यांच्यासह १0 मंत्र्यांची मालमत्ता घटली आहे. पण काही महिला मंत्र्यांच्या संपत्तीत २०१५-१६ मध्ये वाढ झाली आहे.
मनेका गांधी यांच्याकडे २०१४-१५ मध्ये ३८.६४ कोटी रुपयांची संपत्ती होती. २०१५-१६ मध्ये ती वाढून ४४.९९ कोटी रुपयांची झाली. त्याचप्रमाणे सुषमा स्वराज आणि त्यांचे पती स्वराज कौशल यांची २०.५० कोटी रुपयांची संपत्ती २६.१९ कोटी रुपयांपर्यंत वाढली. हरसिमरत कौर बादल यांच्याकडे २०१४-१५ मध्ये ८७.४५ कोटी रुपयांची संपत्ती होती.
तथापि, त्यांनी संपत्तीचे २०१५-१६ साठीचे घोषणापत्र आतापर्यंत सादर केलेले नाही. उमा भारतींकडे २०१४-१५ मध्ये १.४९ कोटी रुपयांची संपत्ती होती. २०१५-१६ मध्ये ती १.७० कोटी रुपये झाली. स्मृती इराणी या एकमेव महिला मंत्री आहेत ज्यांच्या संपत्तीत घट झाली. त्यांच्याकडे २०१४-१५ मध्ये ७.८९ कोेटी रुपयांची संपत्ती होती. ती २०१५-१६ मध्ये ७.५० कोटी रुपयांची झाली.
विवरण देणे पंतप्रधानांनी केले बंधनकारक
- २७ कॅबिनेट मंत्र्यांपैकी १५ मंत्र्यांच्या संपत्तीत २०१५-१६ मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत वाढ, तर मोदी यांच्यासह १० मंत्र्यांच्या संपत्तीत घट झाली आहे. मोदींनी मंत्र्यांना संपत्ती व देणी यांचे विवरण दरवर्षी दाखल करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार २५ मंत्र्यांनी संपत्तीचे विवरण दिले. मनोहर पर्रीकर यांनी विवरण दिलेले नाही.
- संपत्तीची विवरणपत्रे ‘लोकमत’ने मिळवली. त्यानुसार महाराष्ट्राचे दोन मंत्री गरीब झाले. गडकरींकडे १४.५७ कोटींची संपत्ती होती. त्यांची संपत्ती घसरून १२.८४ कोटी रुपयांवर आली. प्रभू यांच्याकडे ५.४१ कोटी रुपयांची संपत्ती होती. तिच्यामध्ये २० लाखांची घट झाली.
- जेटलीही पुन्हा गरीब झाले आहेत. २०१४-१५ मध्ये त्यांच्याकडे १३१.२१ कोटी रुपयांची संपत्ती होती.
ती आता १३०.४२ कोटी झाली आहे. वकिली व्यवसाय सोडल्यापासून त्यांच्या संपत्तीत घट होत आहे. मोदींकडे १.८३ कोटी रुपयांची संपत्ती होती ती घटून १.७३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
मालमत्तेमधील फरक
(सर्व आकडे कोटींत)
मंत्री २०१४-१५१५-१६
नरेंद्रसिंह तोमर १.०१ १.१९
रामविलास पासवान ०.९५ १.२१
हर्षवर्धन १.५४ १.६०
राधामोहन सिंह२.३ ३.२१
राजनाथ सिंह २.९७ ३.४२
जगत प्रकाश नड्डा२.५९ ३.६३
प्रकाश जावडेकर३.२३ ३.९१
कलराज मिश्र५.२७ ६.१४
अनंत गिते५.१४ ६.१९
अशोकजी राजू ५.७७ ७.९
व्यंकय्या नायडू ९.९१ १०.५०
रविशंकर प्रसाद १२.१६ १४.५३
जुएल ओराम २.८६ २.३६
थावरचंद गेहलोत४.१२ ३.५२
अनंत कुमार ४.४९ ४.४८
चौधरी वीरेंद्र सिंह१५.८५ १५.५०
सदानंद गौडा१६.२९ १५.८६
अरुण जेटली १३१.२१ १३०.४२