उत्तर प्रदेशातून १० जण राज्यसभेवर बिनविरोध; भाजपाचे आठ तर सपा, बसपा प्रत्येकी एक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 05:16 AM2020-11-03T05:16:19+5:302020-11-03T05:16:39+5:30
Rajya Sabha : या दहाही उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले असून, त्यांना तसे प्रमाणपत्रही देण्यात आल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी मोहम्मद मुशाहीद यांनी सोमवारी दिली आहे.
Next
लखनौ : केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी आणि इतर नऊ जण उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. यात भाजपच्या ८, तर समाजवादी पार्टी आणि बसपाच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे.
या दहाही उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले असून, त्यांना तसे प्रमाणपत्रही देण्यात आल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी मोहम्मद मुशाहीद यांनी सोमवारी दिली आहे.
पुरी यांच्यासह भारतीय जनता पक्षाने नीरज शेखर, अरुण सिंह, गीता शाक्य, हरिद्वार दुबे, ब्रिजलाल, बी.एल. वर्मा आणि सीमा द्विवेदी, समाजवादी पार्टीचे राम गोपाल यादव आणि बसपाचे रामजी गौतम यांची बिनविरोध निवड झाली आहे. (वृत्तसंस्था)