बनावट नोटा पुरवठादारांना होणार 10 वर्षांचा तुरुंगवास
By admin | Published: February 20, 2017 06:41 PM2017-02-20T18:41:58+5:302017-02-20T18:41:58+5:30
बनावट नोटा सापडल्यानंतर आता न्यायालयानंही कडक निर्देश दिले आहेत.
ऑनलाइन लोकमत
मुझफ्फरनगर, दि. 20 - बनावट नोटा सापडल्यानंतर आता न्यायालयानंही कडक निर्देश दिले आहेत. भारतात बनावट नोटा छापणारे आणि पुरवठादारांना आता 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे, असे आदेश अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश गौरव श्रीवास्तव यांनी दिले आहेत. न्यायालयानं बनावट नोटा छापण्याच्या प्रकरणात दोषी आढळलेले रमेश गुल्टी यांना चपराक लगावत 35 हजारांचा दंडही ठोठावला आहे. त्याच्यासोबत असलेल्या विजय कुमार, अरविंद आणि कसिम यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
मे 2008मध्ये बनावट नोटांच्या तस्करीत या चौघांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी हे चार जण बनावट नोटा छापण्याचं रॅकेट चालवत असून, त्याचा पुरवठा करत असल्याचा आरोप ठेवला होता. त्यावेळी जवळपास 46 हजारांच्या बनावट नोटा मुझफ्फरनगरमध्ये आढळून आल्या आहेत. जिल्ह्यातील चपर गावातून ही बनावट नोटा छापण्याची मशिनही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.