राजदूतांसह ५५ देशांमधील १०० प्रमुख हाेणार प्राणप्रतिष्ठेचे साक्षीदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 06:37 AM2024-01-15T06:37:35+5:302024-01-15T06:37:48+5:30

‘आम्ही कोरियाच्या महाराणींनाही आमंत्रित केले आहे, ज्या प्रभू श्रीरामाच्या वंशज असल्याचा दावा करतात,’ असे स्वामी विज्ञानानंद यांनी सांगितले. 

100 heads of 55 countries along with ambassadors will be witnesses of Prana Pratishta Ram Mandir, Ayodya | राजदूतांसह ५५ देशांमधील १०० प्रमुख हाेणार प्राणप्रतिष्ठेचे साक्षीदार!

राजदूतांसह ५५ देशांमधील १०० प्रमुख हाेणार प्राणप्रतिष्ठेचे साक्षीदार!

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिरात २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राजदूत आणि संसद प्रतिनिधींसह ५५ देशांतील सुमारे १०० प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे, असे जागतिक हिंदू फाउंडेशनचे संस्थापक आणि जागतिक अध्यक्ष स्वामी विज्ञानानंद यांनी रविवारी सांगितले.
रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना बोलावले आहे. ‘आम्ही कोरियाच्या महाराणींनाही आमंत्रित केले आहे, ज्या प्रभू श्रीरामाच्या वंशज असल्याचा दावा करतात,’ असे स्वामी विज्ञानानंद यांनी सांगितले. 

कोणत्या देशातून येणार प्रमुख पाहुणे? 
अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बेलारूस, बोत्सवाना, कॅनडा, कोलंबिया, डेन्मार्क, डॉमिनिका, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (डीआरसी), इजिप्त, इथिओपिया, फिजी, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, घाना, गयाना, हाँगकाँग, हंगेरी, इंडोनेशिया, आयर्लंड, इटली, जमैका, जपान, केनिया, कोरिया, मलेशिया, मलावी, मॉरिशस, मेक्सिको, म्यानमार, नेदरलँड, न्यूझीलंड, नायजेरिया, नॉर्वे, सिएरा लिओन, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, स्पेन, श्रीलंका , सुरीनाम, स्वीडन, तैवान, टांझानिया, थायलंड, त्रिनिदाद आणि टोबॅगो, वेस्ट इंडीज, युगांडा, यूके, यूएसए, व्हिएतनाम आणि झांबिया आदी राष्ट्रांचे राजदूत आणि प्रमुखांना आमंत्रित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

परदेशी पाहुणे २० जानेवारीलाच दाखल हाेणार
संघटनेचे आंतरराष्ट्रीय घडामोडी हाताळणारे विहिंपचे सहसरचिटणीस स्वामी विज्ञानानंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व व्हीव्हीआयपी विदेशी प्रतिनिधी २० जानेवारीला लखनौला येतील. त्यानंतर २१ जानेवारीला सायंकाळपर्यंत ते अयोध्येला पोहोचतील. धुके आणि हवामानामुळे या कार्यक्रमापूर्वी प्रतिनिधींना भारतात येण्याची विनंती करण्यात आली आहे.

पुणेकराने काढला  प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त! 
पुणे : उत्तर प्रदेशातील अयोध्येत साकारत असलेल्या श्रीराम मंदिरात श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी भारतातील ठरावीक मोजक्याच विद्वान ज्योतिषांनी मुहूर्त काढले. यामध्ये पुण्यातील पंचांगकर्ते ज्योतिषी गौरव देशपांडे यांचाही सहभाग असून, देशपांडे यांनी काढलेल्या २२ जानेवारी, २०२४च्या मुहूर्तावरच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. यामुळे या मंदिर पुनर्स्थापनेच्या कार्यात एका पुणेकर व्यक्तीचाही हातभार लागला आहे. 

Web Title: 100 heads of 55 countries along with ambassadors will be witnesses of Prana Pratishta Ram Mandir, Ayodya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.