लोकसभा निवडणुकीत १०० टक्के व्हीव्हीपॅट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 04:36 AM2018-03-15T04:36:06+5:302018-03-15T04:36:06+5:30
सध्या वापरल्या जात असलेल्या ईव्हीएमविषयी शंका उपस्थित केली जात असल्याने केंद्र सरकारने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशभर व्हीव्हीपॅट यंत्रणा असलेली मतदानयंत्रे वापरण्याची तयारी सुरु केली आहे.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : सध्या वापरल्या जात असलेल्या ईव्हीएमविषयी शंका उपस्थित केली जात असल्याने केंद्र सरकारने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशभर व्हीव्हीपॅट यंत्रणा असलेली मतदानयंत्रे वापरण्याची तयारी सुरु केली आहे. लोकसभेत एका प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाकडे सध्या १.७९ लाख व्हीव्हीपॅट यंत्रे आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी २६१६.३ कोटी रुपये खर्च करून १६.१५ लाख व्हीव्हीपॅट यंत्रे खरेदी केली जात आहेत. एप्रिल २०१७ मध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड व इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पाेरेशन आॅफ इंडिया यांना या यंत्रांची आॅर्डर दिली आहे.