‘आयआयएम’मध्ये १०० टक्के उन्हाळी ‘प्लेसमेंट’, नीती आयोगाची कॅम्पसला भेट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 12:36 AM2017-11-03T00:36:05+5:302017-11-03T00:38:48+5:30

कलकत्ता आयआयएमने २०१७-२०१९ बॅचची उन्हाळी प्लेसमेंट (नोकर भरती) प्रक्रिया पूर्ण केली असून, दोन दिवस चाललेल्या या प्रक्रियेत सर्व १०० टक्के मुलांना नोक-या मिळाल्या आहेत.

100% summer 'placement' in 'IIM', meeting of camps of NITI | ‘आयआयएम’मध्ये १०० टक्के उन्हाळी ‘प्लेसमेंट’, नीती आयोगाची कॅम्पसला भेट 

‘आयआयएम’मध्ये १०० टक्के उन्हाळी ‘प्लेसमेंट’, नीती आयोगाची कॅम्पसला भेट 

Next

कोलकाता : कलकत्ता आयआयएमने २०१७-२०१९ बॅचची उन्हाळी प्लेसमेंट (नोकर भरती) प्रक्रिया पूर्ण केली असून, दोन दिवस चाललेल्या या प्रक्रियेत सर्व १०० टक्के मुलांना नोक-या मिळाल्या आहेत.
१८० संस्थांनी आयआयएम कलकात्ताच्या कॅम्पसमध्ये प्लेसमेंट प्रक्रियेसाठी हजेरी लावली. नीती आयोगानेही कॅम्पसला भेट देऊन पाच सन्माननीय प्रस्ताव दिले, अशी माहिती आयआयएमने जारी केलेल्या निवेदनात दिली आहे. कलकत्ता आयआयएम ही भारतातील पहिली ट्रिपल क्राऊन प्राप्त करणारी व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था आहे. जागतिक पातळीवरील तीन मान्यवर अधिस्वीकृती संस्थांकडून मिळणाºया अधिस्वीकृतीस ‘ट्रिपल क्राऊन’ म्हणातत. असोसिएशन टू अ‍ॅडव्हान्स कॉलेजिएट स्कूल आॅफ बिझनेस (एएसीएसबी), असोसिएशन आॅफ एमबीएज (एएमबीए) आणि इक्यूयूआयएस यांचा त्यात समावेश आहे. यंदाच्या प्लेसमेंटमध्ये १८८ प्रस्ताव आले. त्यात ४१ टक्के प्रस्ताव वित्त व सल्लागार क्षेत्रातील होते. गोल्डमॅन सॅशने वित्त क्षेत्रात सर्वाधिक नोकरी प्रस्ताव दिले. सल्लागार क्षेत्रात बोस्टन कन्सल्टिंग समूहाने सर्वाधिक नोकºया दिल्या.

Web Title: 100% summer 'placement' in 'IIM', meeting of camps of NITI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.