नेट न्युट्रॅलिटीला १०० % पाठिंबा - मार्क झुकेरबर्ग

By admin | Published: October 28, 2015 01:54 PM2015-10-28T13:54:38+5:302015-10-28T14:51:37+5:30

'नेट न्युट्रॅलिटी'च्या मागणीला Internet.Org चा १०० टक्के पाठिंबा असल्याचे फेसबूकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने सांगितले.

100% support for Net Neurrality - Mark Zuckerberg | नेट न्युट्रॅलिटीला १०० % पाठिंबा - मार्क झुकेरबर्ग

नेट न्युट्रॅलिटीला १०० % पाठिंबा - मार्क झुकेरबर्ग

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - सर्व नेट पुरवठादारांनी त्यांच्या नेटवर्कवरून होणा-या इंटरनेट सुविधेचे दळणवळण समप्रमाणात करण्याच्या म्हणजेच 'नेट न्युट्रॅलिटी'च्या मागणीला Internet.Org चा १०० टक्के पाठिंबा असल्याचे फेसबूकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने सांगितले. सोशल मीडियातील अग्रगण्य नेटवर्किंग साईट असलेल्या फेसबूकचा सीईओ मार्क भारत भेटीवर आला असून बुधवारी दुपारी त्याने दिल्ली आयआयटीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
नेट न्युट्रॅलिटीपासून ते कँडी क्रश सागाच्या रिक्वेस्ट्स कशा रोखायच्या या सर्व विषयांवर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मार्कने दिलखुलास शैलीत उत्तर देत आत्तापर्यंतच्या प्रवासातील केलेल्या चुकांबद्दल माहिती दिली. नेट न्युट्रॅलिटीला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. ज्या लोकांकडे आत्ता इंटरनेट सुविधा आहे तेच न्युट्रॅलिटीबद्दल बोलत आहेत, पण ज्यांच्याकडे ही सुविधा उपलब्धच नाही त्यांचा विचार करणे आपले कर्तव्यअसून फक्त नेट नसल्यामुळे त्यांचा आवाज दबला जाईल असे होऊ द्यायला नको. नेट न्युट्रॅलिटीबाबत जगात वेगवेगळ्या देशांतील सरकार नियम तयार करत आहेत. इंटरनेट खर्चिक असल्याने ते मोफत उपलब्ध करून देणे कोणालाही शक्य नाही. पण ज्या प्राथमिक सुविधा आहेत त्या सर्वांसाठी उपलब्ध असाव्यात असे मला वाटते. कमी बॅंडविड्थमध्ये हे देणे शक्य होणार आहे, असे मार्कने सांगितले.
जगातील प्रत्येक व्यक्तीशी जोडलं जाण हे आमचं उद्दिष्ट आहे, मात्र भारताशी जोडलं गेल्याशिवाय जगाशी जोडलं जाण अशक्य आहे. भारत ही अतिशय मोठी आणि महत्वपूर्ण बाजारपेठ असून जगात वेगाने विस्तार करायचा असेल तर भारतात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणंही तितकचं महत्वाच आहे, असं मार्क म्हणाला. 
भारतात कोट्यावधी लोक इंटरनेट आणि फेसबूक अॅक्सेस करत असले तरीही तेवढेच लोक या सेवेपासून वंचितही आहेत, त्याचे कारण काय आणि त्यांच्याशी कसे जोडले जाणार असा सवाल एका विद्यार्थ्याने मार्कला विचारला. नेटवर्क, किंमत आणि जागरूकता या तीन महत्वाच्या बाबींमुळे लोकांना इंटरनेट सुविधेपासून वंचित आहेत. मात्र हे तीन अडथळे मोडून काढण्यासाठी आम्ही काम करत आहोत. इंटरनटेप्रती लोकांची जाणीव वाढवण्यासाठी कमीत कमी डेटा वापरणारी 'अॅप्लिकेशन्स' आणण्यावर आम्ही भर देत आहोत, असे मार्कने स्पष्ट केले. 
सध्याच्या इंटरनेट सॅव्ही जगात फेसबूक हा लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, मात्र त्याच फेसबूकवर अविरत येणा-या कँडी क्रश सागा गेमच्या रिक्वेस्ट्समुळे युझर्स त्रस्त झाले असून मार्कच्या दिल्ली भेटीतही हे स्पष्टपणे जाणवले. अतिशय इरिटेटिंग असणा-या या रिक्वेस्ट्सची नोटिफिकेन्सची नक्की कशी थांबवायची हा प्रश्न मार्कला विचारण्यात आला असात ऑडिटोरियममध्ये एकच हशा पिकला. मात्र आपण व आपली टीम यावर काम करत असून लवकरच त्यावर तोडगा निघेल, असे आश्वासन मार्कने दिले. 

 

Web Title: 100% support for Net Neurrality - Mark Zuckerberg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.