चोपड्यात कारमधून १०० तलवारी जप्त
By Admin | Published: February 17, 2016 11:47 PM2016-02-17T23:47:51+5:302016-02-17T23:47:51+5:30
जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा शहरात सापळा रचून एका कारमध्ये असलेल्या १०० तलवारी जप्त केल्या. ही कारवाई मंगळवारी रात्री ११ वाजेनंतर ही कारवाई झाली. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास अटक केली असून त्याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज गाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा शहरात सापळा रचून एका कारमध्ये असलेल्या १०० तलवारी जप्त केल्या. ही कारवाई मंगळवारी रात्री ११ वाजेनंतर ही कारवाई झाली. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास अटक केली असून त्याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडा शहरातील भावसार गल्लीत मुस्तफा दर्ग्याजवळ राहणारा मुकेश मोहनलाल शर्मा हा त्याच्या (जीजे १२ पी ९६०९) क्रमांकाच्या कारमधून तलवारी आणत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खबर्याने दिली होती. त्यानुसार, पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी सहायक पोलीस निरीक्षक मुश्ताक अली सैय्यद, हेड कॉन्स्टेबल उत्तमसिंग पाटील, मनोहर देशमुख, विजय पाटील, पोलीस नाईक ईश्वर सोनवणे, शिपाई योगेश पाटील, मनोज दुसाने, सुशील पाटील, बबन तडवी यांचे पथक तयार करून चोपड्याला पाठवले. या पथकाने भावसार गल्लीत सापळा लावला होता. मुकेश शर्मा रात्री ११ वाजेच्या सुमारास गाडीसह त्याच्या घरी येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. गाडीची झडती घेतली असता, तिच्या मागील सीटवर तीन पोत्यांमध्ये एकूण १०० तलवारी आढळल्या. या तलवारींची किंमत सुमारे ५० हजार रुपयांच्या घरात आहे. म्हणून पोलिसांनी मुकेशला अटक करून त्याला चोपडा शहर पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.राजस्थानहून विक्रीसाठी आणल्या तलवारीमुकेश याने या तलवारी विक्रीच्या उद्देशाने राजस्थान राज्यातील सिरोही येथून आणल्या आहेत. राजस्थानहून घरी परत येतांना शिरपूरमार्गे तो चोपड्याला आला. आर्थिक फायद्याच्या हेतूने त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली आहे. काही महिन्यांपूर्वी नरडाणा पोलिसांनीदेखील मध्यप्रदेशातून आणलेल्या तलवारींसह दोघांना ताब्यात घेतले होते. त्यामुळे या प्रकारात मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आईसक्रीम विक्रीचा व्यवसायपोलिसांच्या ताब्यात असलेला मुकेश शर्मा हा मूळचा राजस्थानातील रहिवासी आहे. मात्र, तीन पिढ्यांपासून त्याचे कुटुंबिय चोपड्यात राहत असून त्याचे वडील आईसक्रीम विक्रीचा व्यवसाय करतात. तो वडिलांना व्यवसायात मदत करतो. त्याच्याविषयी अधिक माहिती काढली जात आहे.