१०० दहशतवाद्यांना काश्मिरात कंठस्नान
By admin | Published: June 21, 2016 07:36 AM2016-06-21T07:36:17+5:302016-06-21T07:36:17+5:30
जम्मू आणि काश्मिरात सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत गेल्या वर्षी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू कासीम याच्यासह १०० दहशतवादी मारले गेले.
जम्मू : जम्मू आणि काश्मिरात सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत गेल्या वर्षी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू कासीम याच्यासह १०० दहशतवादी मारले गेले. दोन वर्षांपूर्वी श्रीनगर येथे लष्करी ताफ्यावर हल्ला करणाऱ्यांत अबू सामील होता.
२०१५ मध्ये विविध मोहिमांत अबूसारख्या प्रमुख कमांडरसह १०० हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याचे डिफेन्स नादर्न कमांडचे जनसंपर्क अधिकारी कर्नल एस. डी. गोस्वामी यांनी सांगितले. दहशतवाद्यांना ठार मारण्याबरोबरच गेल्या वर्षी ३५० शस्त्रे आणि ४० आईडी, तसेच दारूगोळ्याचे साठे जप्त करण्यात आले. यातून जम्मू व काश्मिरातील दहशतवादाला पाठबळ देणे पाकने सुरूच ठेवल्याचे दिसून येते. (वृत्तसंस्था)