नक्षलग्रस्त राज्यांना १००० कोटींचा निधी
By Admin | Published: January 6, 2016 11:52 PM2016-01-06T23:52:06+5:302016-01-06T23:52:06+5:30
केंद्र सरकारने महाराष्ट्रासह देशातील ७ नक्षलग्रस्त राज्यांमधील ३५ जिल्ह्यांसाठी १,००० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने महाराष्ट्रासह देशातील ७ नक्षलग्रस्त राज्यांमधील ३५ जिल्ह्यांसाठी १,००० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नक्षलवादासोबत लढ्यास आवश्यक सोयीसुविधा आणि विकास कार्याकरिता हा निधी वापरला जाईल.
या नक्षलग्रस्त ३५ जिल्ह्णांमध्ये झारखंडमधील १६, छत्तीसगडच्या ८, बिहारमधील ६, ओडिशातील दोन आणि महाराष्ट्र,आंध्रप्रदेश व तेलंगणाच्या प्रत्येकी एका जिल्ह्णाचा समावेश आहे.