१००० रुपयाची नोट पुन्हा चलनात येणार? नव्या रिपोर्टमध्ये देण्यात आली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 05:35 PM2023-10-20T17:35:15+5:302023-10-20T17:37:04+5:30

 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर 1000 रुपयांची नोट चलनातून बाद होऊ शकते असा अंदाज लावला जात होता.

1000 rupees notes coming back in currency or not know what latest report says RBI | १००० रुपयाची नोट पुन्हा चलनात येणार? नव्या रिपोर्टमध्ये देण्यात आली महत्त्वाची माहिती

१००० रुपयाची नोट पुन्हा चलनात येणार? नव्या रिपोर्टमध्ये देण्यात आली महत्त्वाची माहिती

1000 Currency Notes: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी रात्री जनतेशी संवाद साधत एक घोषणा केली. 2016 मध्ये नोटाबंदीच्या वेळी 500 रुपयांच्या चलनी नोटांसोबत 1000 रुपयांच्या नोटांवरही बंदी घालण्यात आली. सरकारने 1000 रुपयांच्या नोटेऐवजी 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणल्या. आरबीआयने 500 रुपयांच्या जुन्या नोटांच्या जागी नव्या नोटा जारी केल्या. पण हजार रुपयाची नोट अद्याप चलनात आलेली नाही. पण लवकरच ही नोट चलनात येणार अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर RBI कडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

1000 रुपयांची नोट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र आता 1000 रुपयांची नोट चलनातून परत येत नसल्याचे एका अहवालात स्पष्ट झाले होते. वृत्तसंस्था ANI ने आज (20 ऑक्टोबर 2023) सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली की RBI अशा कोणत्याही योजनेचा विचार करत नाही. म्हणजेच 1000 रुपयांची नोट पुन्हा चलनात आणण्याची कोणतीही योजना नाही. या वर्षी (2023) आरबीआयने 2000 रुपयांची नोटही चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला. 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर 1000 रुपयांची नोट चलनातून बाद होऊ शकते असा अंदाज लावला जात होता. पण “आरबीआय 1,000 रुपयांची नोट पुन्हा चलनात आणण्याचा विचार करत नाही,” एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे. 

या वर्षाच्या सुरुवातीलाही, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पुष्टी केली होती की 1000 रुपयांची नोट पुन्हा चलनात आणण्याची कोणतीही योजना नाही. आरबीआय गव्हर्नर म्हणाले होते, 'या सर्व अफवा आहेत. असे अंदाज बांधण्यात काहीच अर्थ नाही. सध्या असा कोणताही प्रस्ताव नाही."

Web Title: 1000 rupees notes coming back in currency or not know what latest report says RBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.