इंजिनिअरिंग, मॅनेजमेंटच्या यंदा १० हजार कमी जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 04:58 AM2020-07-28T04:58:29+5:302020-07-28T04:58:57+5:30
तंत्रशिक्षण परिषदेच्या निर्णयांचा परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र व अन्य काही तांत्रिक विषयांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी यंदा जुन्या शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशक्षमता सुमारे १.५ लाखाने कमी केल्याने तसेच नव्या संस्था किंवा आधीच्या संस्थांची प्रवेशक्षमता १.४ लाखाने वाढविल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सुमारे १० हजार जागा कमी उपलब्ध असणार आहेत.
यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी देशभरात विविध तांत्रिक विषयांच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी एकूण किती जागा उपलब्ध असतील, याची सविस्तर आकडेवारी परिषदेने जाहीर केली. त्यानुसार अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र, नगररचना, उपायोजित कला व कौशल्य, हॉटेल मॅमेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजी यासारख्या अभ्यासक्रमांसाठी ९,६९१ संस्थांमध्ये मिळून ३० लाख ८८ हजार ५१२ जागा विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी उपलब्ध असतील.
34,553
प्रवेशक्षमता असलेल्या १७९ संस्था गेल्या वर्षभरात बंद झाल्या, तर ४४ संस्थांवर परिषदेने दंडात्मक कारवाई केल्याने तेथील ८,८३२ प्रवेशाच्या जागा यंदा रद्द झाल्या.
च्गेल्या शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत यंदा उपलब्ध प्रवेशाच्या जागांमध्ये फेरफार प्रामुख्याने या कारनांमुळे झाले.
69,965
६९,९६५ जागांचे प्रवेश स्वत:हून बंद केले. गेली अनेक वर्षे पुरेसे विद्यार्थी मिळाल्याने ७६५ संस्थांनी प्रवेश बंद केले.
च्शिवाय ४०,५७८ एवढी प्रवेशक्षमता असलेल्या १३४ संस्थांनी यंदा नव्याने मान्यतेसाठी अर्जच केले नाहीत.
39,656
एवढी प्रवेशक्षमता असलेल्या नव्या संस्थांना गेल्या वर्षभरात मंजुरी दिली गेली, तसेच आधीपासून सुरू असलेल्या संस्थांमधील एक लाख दोन हजार वाढीव जागांनाही मंजुरी दिली गेली.