भारतात 101.79 कोटी मोबाईल वापरकर्ते
By admin | Published: March 29, 2016 04:16 PM2016-03-29T16:16:16+5:302016-03-29T16:16:16+5:30
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार भारतातील मोबाईल वापरकर्त्यांचा आकडा 101.79 कोटींवर पोहोचला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २९ - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार भारतातील मोबाईल वापरकर्त्यांचा आकडा 101.79 कोटींवर पोहोचला आहे. 31 जानेवारी 2016 पर्यंतची ही आकडेवारी आहे. तर लँडलाईन वापरणा-यांची संख्या 2.53 कोटी आहे. एकूण दूरसंचार वापरकर्त्यांची आकडेवारी 104 कोटींवर पोहोचली आहे.
जानेवारी महिन्यात 70 लाख लोकांनी दूरसंचार वापरास सुरुवात केली. एअरटेलने सर्वात जास्त 25 लाख ग्राहक जोडले आहेत. तर आयडीयाने 12.51 लाख आणि वोडाफोनने 11.12 लाख ग्राहक जोडले आहेत. बीएसएनएल चौथ्या क्रमांकावर असून 9.25 लाख ग्राहक जोडले गेले. टेलिनोरने 7.24 लाख, एअरसेलने 4.35 लाख आणि रिलायन्स कम्युनिकेशनने 3.15 लाख नवे ग्राहक जोडले आहेत.