१०२ वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा
By admin | Published: May 16, 2016 12:44 AM2016-05-16T00:44:51+5:302016-05-16T00:44:51+5:30
जळगाव : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनधारकांविरोधात शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचार्यांनी रविवारी मोहीम राबवली. या मोहिमेत दिवसभरात १०२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यातून सुमारे १० हजार रुपयांची दंडवसुली झाली, अशी माहिती शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयाकडून मिळाली.
Next
ज गाव : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनधारकांविरोधात शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचार्यांनी रविवारी मोहीम राबवली. या मोहिमेत दिवसभरात १०२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यातून सुमारे १० हजार रुपयांची दंडवसुली झाली, अशी माहिती शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयाकडून मिळाली.नवीन बसस्थानक परिसरासह आकाशवाणी चौक, नेहरू चौक, स्वातंत्र्य चौक, टॉवर चौकात रहदारीस अडथळा निर्माण करणार्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या १७ रिक्षांवर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली. त्यात गणवेश परिधान न करणार्या रिक्षा चालकांचाही समावेश होता. त्याचप्रमाणे चालक परवाना जवळ न बाळगणे, ट्रिपल सीट गाडी चालवणे, गाडी चालवताना मोबाइलवर बोलणे, सिग्नल मोडणे अशा इतर ८५ वाहनांवरही दंडात्मक कारवाई झाली. प्रत्येक वाहन व रिक्षा चालकाकडून प्रत्येकी १०० ते २०० रुपये दंड करण्यात आला. यापुढेही अशा स्वरुपाची कारवाई सुरूच राहणार आहे. ही मोहीम वाहतूक शाखेतील हेड कॉन्स्टेबल प्रकाश परदेशी, पोलीस नाईक भगवान आरखे, पंडित वानखेडे, धनराज पाटील, सचिन निकम, राजू मोरे, रमेश अहिरे, स्वप्नाली सोनवणे, कविता विसपुते, विलास पाटील, सुनील पाटील, योगेश पवार यांनी राबवली.