रोजगार मागणारे १.०३ कोटी; नोकऱ्या फक्त १.७४ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 12:52 AM2020-09-17T00:52:56+5:302020-09-17T00:53:17+5:30

श्रम मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार महाराष्ट्रात १३,३२,०९१ लाख, उत्तर प्रदेशमध्ये १४,६२ ९९२ लाख व पश्चिम बंगालमध्ये २३,६१,६३० लाख लोकांनी नोंदणी केली आहे.

1.03 crore seeking employment; Jobs only 1.74 lakh | रोजगार मागणारे १.०३ कोटी; नोकऱ्या फक्त १.७४ लाख

रोजगार मागणारे १.०३ कोटी; नोकऱ्या फक्त १.७४ लाख

Next

- नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : देशात एक कोटीपेक्षा जास्त लोक नोकरी मागत असले तरी फक्त १.७४ लाखच जागा रिक्त आहेत. नोकºया मागणाऱ्यांत सर्वात जास्त महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालमधील आहेत.
श्रम मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार महाराष्ट्रात १३,३२,०९१ लाख, उत्तर प्रदेशमध्ये १४,६२ ९९२ लाख व पश्चिम बंगालमध्ये २३,६१,६३० लाख लोकांनी नोंदणी केली आहे.
देशात उपलब्ध १७७,३८६ नोकºयांमध्ये सगळ््यात जास्त ८३ ,६०९ पदवीधर व ४०,५८७ बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी होत्या. त्यानंतर १९,१३२ निरक्षर, १५,१४५ दहावी उत्तीर्ण, १०,९९९ रिक्त जागांना किमान पात्रता म्हणून १२ नंतर पदविकेची मागणी जास्त आहे. सगळ््यात कमी संधी पदवीधरापासून जास्त योग्यतेच्या लोकांना होती. एकूण नोकºयांत पदव्युत्तर पदविका करणाºयांसाठी ७५ व पीएचडी झालेल्या उमेदवारांसाठी फक्त २०१ संधी उपलब्ध आहेत.
लॉकडाउनमध्ये नोकºया जवळपास संपल्या आहेत. अनलॉकमध्ये रोजगाराची संधी पुन्हा वाढत आहे.


३,५६३ च नोकºया
आॅगस्टअखेरपर्यंत महाराष्ट्रात रोजगारासाठी नोंदणी केलेल्या १३,३२,९०१ लाख व्यक्तींना फक्त ३,५६३ नोकºयाच उपलब्ध होत्या.

Web Title: 1.03 crore seeking employment; Jobs only 1.74 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी