Terror Attack : तीन वर्षांत १,०३४ दहशतवादी हल्ले, १७७ जवानांना हौतात्म, केंद्र सरकारने राज्यसभेत दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 01:45 PM2021-11-30T13:45:37+5:302021-11-30T13:49:59+5:30
Terror Attack In India: मागील तीन वर्षांत देशभरात एकूण १,०३४ दहशतवादी हल्ले झाले व यामध्ये १७७ जवान शहीद झाले. यातील १,०३३ हल्ले जम्मू-काश्मीरमध्ये झाले, तर एक हल्ला दिल्लीत झाला.
नवी दिल्ली : मागील तीन वर्षांत देशभरात एकूण १,०३४ दहशतवादी हल्ले झाले व यामध्ये १७७ जवान शहीद झाले. यातील १,०३३ हल्ले जम्मू-काश्मीरमध्ये झाले, तर एक हल्ला दिल्लीत झाला.
राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी विचारलेल्या एका लिखीत प्रश्नाच्या उत्तरात संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी ही माहिती दिली. २०१९मध्ये देशभरात एकूण ५९४ अतिरेकी हल्ले झाले व हे सर्व जम्मू-काश्मीरमध्ये झाले. २०२०मध्ये २४४ हल्ले झाले व तेही जम्मू-काश्मीरमध्ये झाले. २०२१मध्ये आतापर्यंत १९६ अतिरेकी हल्ले झाले. यातील १९५ हल्ले जम्मू-काश्मीरमध्ये तर एक हल्ला दिल्लीत झाला. या कालावधीत पंजाब किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी अतिरेकी हल्ला झाला नाही. २०१९ पासून आजवरच्या अतिरेकी हल्ल्यांमध्ये केंद्रीय दलांसह इतर दलांचे एकूण १७७ जवान शहीद झाले. २०१९मध्ये ८०, २०२०मध्ये ६२ व २०२१मध्ये आतापर्यंत ३५ जवान शहीद झाले.