१०५० भारतीयांना सुखरूप परत आणले

By admin | Published: April 27, 2015 04:15 AM2015-04-27T04:15:38+5:302015-04-27T04:15:38+5:30

नेपाळला या संकटामध्ये मदत करण्यासाठी भारताने आपला मदतीचा हात पुढे केला आहे. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन

1050 Indians safely brought back | १०५० भारतीयांना सुखरूप परत आणले

१०५० भारतीयांना सुखरूप परत आणले

Next

नवी दिल्ली : नेपाळला या संकटामध्ये मदत करण्यासाठी भारताने आपला मदतीचा हात पुढे केला आहे. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन बचावकार्याची माहिती दिली. भारताने आतापर्यंत १०५० भारतीयांना हवाई मार्गे नेपाळमधून सुखरूप परत आणले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडविण्यासाठी २५ बसचीही सोय केल्याचे सांगून या बस उत्तर प्रदेशातील सुनाऊनी व बिहारमधील राक्साउलपर्यंत येतील, असे त्यांनी सांगितले.
सरकारने भूकंपात बळी पडलेल्या बळींच्या नातेवाइकांना देण्यात येणाऱ्या रकमेतही वाढ करण्याचा आज निर्णय घेतला. भूकंपामध्ये मरण पावलेल्या
भारतीय व्यक्तींच्या कुटुंबीयांना ६ लाख
रुपयांची मदत भारत सरकार देईल, असे स्पष्ट करून जयशंकर पुढे म्हणाले, सध्या सहा सी-१७ विमाने कार्यरत असून, लष्कराची आणखी तेरा विमाने काठमांडूच्या दिशेने रवाना होतील. भारतातील भूकंपाची माहिती देताना गृहसचिव एल.सी. गोयल यांनी भारतामध्ये आतापर्यंत ६२ जणांनी प्राण गमावले असून, २५९ व्यक्ती जखमी झाल्याचे सांगितले.

Web Title: 1050 Indians safely brought back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.