१०७१ पिशव्या रक्तसंकलन स्मृति दिन : जैन इरिगेशनतर्फे रक्तदान शिबिर

By Admin | Published: March 11, 2016 12:27 AM2016-03-11T00:27:44+5:302016-03-11T00:27:44+5:30

1071 bags Blood Collection Day: Blood Donation Camp by Jain Irrigation | १०७१ पिशव्या रक्तसंकलन स्मृति दिन : जैन इरिगेशनतर्फे रक्तदान शिबिर

१०७१ पिशव्या रक्तसंकलन स्मृति दिन : जैन इरिगेशनतर्फे रक्तदान शिबिर

googlenewsNext
>जळगाव- जैन इरिगेशनचे संस्थापक स्व.भवरलाल जैन यांचे वडील हिरालाल जैन (बाबा) यांच्या २६ व्या स्मृति दिनानिमित्त जैन इरिगेशनतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात १०७१ पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले.
जैन इरिगेशनच्या प्लास्टिक पार्क, जैन एनर्जी पार्क, ॲग्रीपार्क, जैन हिल्स, फूडपार्क, डिव्हाईन पार्क, चित्तूर, हैद्राबाद, भावनगर, अलवर येथील सहकार्‍यांनी रक्तदान केले. शहरात जिल्हा रुग्णालय, रेडक्रॉस सोसायटी, केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी, गोदावरी रक्तपेढी या संस्थांनी संकलन केले. यानिमित्त दरवर्षी रक्तदान करण्याचा संकल्प सहकार्‍यांनी केला. सुरुवातीला जैन हिल्स येथील बडी हांडा सभागृहात डॉ.सुभाष चौधरी यांच्याहस्ते उद्घाटन झाले. या वेळी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन यांनी रक्तदान केले. गोळवलकर रक्तपेढीचे डॉ.विजय सोमकुवर, भानुदास येवलेकर, आनंद जोशी, सुनील पाटील, जयवंत पाटील, उज्ज्वला पाटील, उदित टाक, सागर खर्चाणे, रश्मी नाटेकर, जिल्हा रुग्णालयातील डॉ.उमेश कोल्हे, तुषार भावसार, भरत महाले, नीलेश पवार, एल.एम.त्रिपाठी, दत्तात्रेय चौधरी, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, गनी मेमन, उज्ज्वला वर्मा, डॉ.पी.बी.जैन, डॉ.ए.डी.चौधरी, राजेंद्र कोळी, किरण बाविस्कर, सुनीता मेथे, ज्योती जाधव, नरेंद्र पन्हाळे यांनी सहकार्य केले. तसेच शहरातील संत गाडगेबाब उद्यानात गोर गरिबांना अन्नदान करण्यात आले. या वेळी संघपती दलुभाऊ जैन यांनी मांगलिक म्हटले. बालक आश्रम, अंध शाळा, हरिजन सेवक संघ मुलींचे वसतीगृह, गायत्री मंदिर, बाबा हरदास संघ आदी ठिकाणी भोजन पाठविण्यात आले.

Web Title: 1071 bags Blood Collection Day: Blood Donation Camp by Jain Irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.