१0८ रुग्णवाहिका कर्मचारी १८ पासून संपावर
By admin | Published: February 14, 2015 11:50 PM2015-02-14T23:50:45+5:302015-02-14T23:50:45+5:30
पणजी : जीव्हीएमके इएमआरआयच्या व्यवस्थापनाकडून कामावर सतावणूक करण्यात येते. याबाबत राज्य सरकार, तसेच आरोग्यमंत्र्यांना वारंवार सांगूनही समस्येवर तोडगा काढण्यात येत नसल्याने १0८ रुग्णवाहिका सेवेच्या कर्मचार्यांनी बुधवार १८ फेब्रुवारीपासून संप पुकारला आहे.
Next
प जी : जीव्हीएमके इएमआरआयच्या व्यवस्थापनाकडून कामावर सतावणूक करण्यात येते. याबाबत राज्य सरकार, तसेच आरोग्यमंत्र्यांना वारंवार सांगूनही समस्येवर तोडगा काढण्यात येत नसल्याने १0८ रुग्णवाहिका सेवेच्या कर्मचार्यांनी बुधवार १८ फेब्रुवारीपासून संप पुकारला आहे.रुग्णवाहिकेची सेवा अत्यावश्यक असल्याचे भान आम्हाला आहे. मात्र, व्यवस्थापनाकडून आमच्यावर होणारा मानसिक त्रास सहन करण्याच्या पलीकडे गेला आहे. सरकारकडे याची तक्रार करूनही दखल न घेतली जात असल्याने आम्हाला संप पुकारावा लागत असल्याचे भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष हृदयनाथ शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.बुधवारी १८ रोजी सर्व रुग्णवाहिका व्यवस्थापनाकडे सुपूर्द केल्या जातील. त्याचप्रमाणे कर्मचार्यांना देण्यात येणारे मोबाईल फोनही व्यवस्थापनाकडे देण्यात येईल. त्यानंतर पणजी आझाद मैदानावर एकत्र येऊन कर्मचारी व्यवस्थापनाविरोधात निदर्शने करतील. तर १९ रोजी आरोग्य संचालनालयाच्या इमारतीकडे धरणे आंदोलन करण्यात येईल. त्यानंतरही सरकारने व व्यवस्थापनाने आमच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले नाही, तर कर्मचारी साखळी उपोषणाला बसतील. कर्मचार्यांच्या सतावणुकीबरोबरच नोकरीचा प्रश्न असून आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्यास बेमुदत उपोषण करण्याची तयारीही कर्मचार्यांनी दाखविली आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले.दरम्यान, सरकारने यापूर्वी अत्यावश्यक सेवा कायदा १0८ रुग्णवाहिका सेवेसाठी लागू केला आहे. तरीही आंदोलन करण्यासाठी १0८ रुग्णवाहिकेचे कर्मचारी ठाम आहेत. (प्रतिनिधी)