प्राणप्रतिष्ठेसाठी १०८ फूट लांब अगरबत्ती; ४५ दिवस जळत राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 05:25 AM2023-12-21T05:25:56+5:302023-12-21T05:26:10+5:30

मे महिन्यापासून अगरबत्ती बनवण्यास सुरुवात केली होती. अगरबत्ती तयार करण्यासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च झाला आहे.

108 feet long incense stick for ram mandir Pranpratistha; It will burn for 45 days | प्राणप्रतिष्ठेसाठी १०८ फूट लांब अगरबत्ती; ४५ दिवस जळत राहणार

प्राणप्रतिष्ठेसाठी १०८ फूट लांब अगरबत्ती; ४५ दिवस जळत राहणार

वडोदरा : अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी गुजरातच्या वडोदरामध्ये १०८ फूट लांब, ३.५ फूट रुंद महाअगरबत्ती तयार करण्यात आली आहे. 

तिचे वजन ३,४२८ किलो आहे. ११० फूट लांबीच्या ट्रेलरवर अगरबत्ती ठेवली जाईल आणि १ जानेवारीला रस्त्याने अयोध्येला नेण्यात येईल. हा रथ १६ जानेवारीला अयोध्येला पोहोचेल. अगरबत्ती ४५ दिवस जळत राहतील. विहाभाई करशनभाई भरवाड म्हणाले की, मे महिन्यापासून अगरबत्ती बनवण्यास सुरुवात केली होती. अगरबत्ती तयार करण्यासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च झाला आहे.  अगरबत्ती अयोध्येला नेण्यासाठी सुमारे १५ लाख रुपये खर्च येणार आहे.

अगरबत्तीमध्ये नेमके आहे काय? 
अगरबत्तीसाठी १४७५ किलो गीर गाईचे शेण, १९१ किलो गीर गाईचे तूप, २८० किलो देवदाराचे लाकूड, ३७६ किलो गुग्गल, २८० किलो तीळ, २८० किलो बार्ली, ३७६ किलो खोपरे पावडर, ४५० किलो हवन साहित्य, २५० किलो गुलाबाचे फूल, २०० किलो परफ्यूम वापरण्यात आले.

Web Title: 108 feet long incense stick for ram mandir Pranpratistha; It will burn for 45 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.