बापरे! १०८ मेगापिक्सलचा Motorola Edge+ लाँच; लगेचच 15000 चा डिस्काऊंट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 03:36 PM2020-05-19T15:36:03+5:302020-05-19T15:36:30+5:30
मोटोरोलाने काही दिवसांपूर्वीच जागतिक बाजारात नवीन फ्लॅगशिप सिरीज लाँच केली होती. या सिरीजच्या सर्वातवरच्या मोबाईलला भारतात लाँच करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : मोटोरोलाने भारतात नवीन स्मार्टफोन लाँच केल आहे. हा फोन Motorola Edge+ असून महत्वाचे म्हणजे या फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन फक्त फ्लिपकार्टवरच मिळणार असून आणखी एक भन्नाट गोष्ट म्हणजे लाँच करतानाच १५ हजार रुपयांचा डिस्काऊंट जाहीर करण्यात आला आहे.
मोटोरोलाने काही दिवसांपूर्वीच जागतिक बाजारात नवीन फ्लॅगशिप सिरीज लाँच केली होती. या सिरीजच्या सर्वातवरच्या मोबाईलला भारतात लाँच करण्यात आले आहे. १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत ८९९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र, फ्लिपकार्टने यावर घसघशीत डिस्काऊंट देऊ केला असून हा फोन ७४९९९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. हा फोन दोन रंगात उपलब्ध आहे. की संग्रिया आणि थंडर ग्रे असे हे दोन रंग आहेत.
मोटरोलाच्या या नव्या फोनला कॅमेरा आणि डिस्प्ले हे दोन्ही एकदम खास बनवितात. ६.७ इंचाचा HD+ OLED कर्व्ह्ड डिस्प्ले देण्यात आला असून रिफ्रेश रेट ९०Hz देण्यात आला आहे. डिस्प्लेला HDR10+ सपोर्ट मिळतो. सेल्फी कॅमेरासाठी पंच होल देण्यात आला आहे. क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर देण्यात आला आहे.
पाठीमागे 108 मेगापिक्सलचा f/1.8 अपर्चरचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर दुसरा कॅमेरा १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स तिसरा ८ मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स 3x ऑप्टिकल झूमसह देण्यात आला आहे. डेप्थ सेन्सिंगसाठी टाईम ऑफ फ्लाईट सेन्सरही देण्यात आला आहे.
५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली असून १८ W फास्ट चार्जिंग सपोर्टचा चार्जरही देण्यात आला आहे. तसेच रिव्हर्स वायरलेस सपोर्टही देण्यात आला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मुंबईवर मोठे संकट! १०० हून अधिक कोरोनाग्रस्त बेपत्ता; शोधाशोध सुरु
हवाई दलाचा हवेतल्या हवेत असा पराक्रम...जो पाहून उर भरून येईल
CoronaVirus मोठी भीती! ...यामुळे एड्सवर औषध कधीच शोधता आले नाही; कोरोनाबाबतही असेच झाले तर
Lockdown: अज्ञात व्यक्ती देवदूत बनून आला; चार गरजूंचे लाखोंचे कर्ज फेडले
सावधान! भारताचा योद्धा येतोय; एकटाच पाकिस्तान, चीनला भारी पडणार