10वी नापास झालेल्या व्यक्तीची कमाल; सुरू केला स्टार्टअप, 26 व्या वर्षी 25 लाखांची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 12:44 PM2023-09-27T12:44:57+5:302023-09-27T12:45:26+5:30
दहावीत नापास झाल्यानंतर त्याने अभ्यास सोडून स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यांची वार्षिक उलाढाल 25 लाख रुपये आहे.
जगात असे काही लोक आहेत जे अभ्यासात अपयशी ठरतात पण आयुष्यात मात्र यशस्वी होतात. ते स्वप्न पाहतात आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. असाच एक तरुण म्हणजे दानवीर सिंह. दहावीत नापास झाल्यानंतर त्याने अभ्यास सोडून स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यांची वार्षिक उलाढाल 25 लाख रुपये आहे.
खरं तर आता बदलत्या काळाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्याचबरोबर या बदलत्या काळात आणखी एक गोष्ट बदलली आहे, ती म्हणजे फॅशन. त्याचा थेट परिणाम बाडमेरच्या तरुणांवर दिसून येत आहे. आता इथली तरुणाई धोती-कुर्ता वापरत आहे. बारमेरच्या बाजारपेठेत अनेक आऊटलेट सुरू झाले आहेत. लग्न समारंभांपासून ते वाढदिवसाच्या पार्टीपर्यंत प्रत्येकजण आता नव्या रुपात दिसत आहे.
26 व्या वर्षी 25 लाखांची वार्षिक उलाढाल
बाडमेर शहरातील भगवती कॉम्प्लेक्समध्ये असलेले आशापुरा साफा हाऊस आपल्या एका कल्पनेमुळे चर्चेत आले आहे. येथे इन्स्टाग्रामवरून ऑनलाईन ऑर्डर बुक केल्या जातात आणि जपान, तामिळनाडू, चेन्नई, बंगळुरू, गुजरात येथे कुरिअर देखील केले जातात. साफा हाऊसचा मालक दानवीर सिंहच्या म्हणण्यानुसार, दहावीत नापास झाल्यानंतर 2 वर्षे जोधपूरमध्ये काम शिकला आणि त्यानंतर स्टार्टअप सुरू केला. वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी 25 लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे.
साफा हाऊसचे स्टार्टअप 5 वर्षांपूर्वी सुरू झाले होते. त्याच्या जागी जोधपुरी, जैसलमेरी, बारमेरी आणि नागौरी गोल साफाचा ट्रेंड वाढला आहे. त्यांची वार्षिक उलाढाल 25 लाख रुपये असल्याचेही सांगितले. बाडमेर जिल्ह्यातील बाटाडू हॉल इंदिरा कॉलनीतील रहिवासी दानवीर सिंह आणि त्याचा भाऊ डेरावर सिंह यांच्यासह सहा कर्मचारी येथे कार्यरत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.