टेम्पोला झालेल्या भीषण अपघातात 11 वऱ्हाड्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 08:42 AM2020-02-23T08:42:42+5:302020-02-23T08:44:37+5:30
वऱ्हाड घेऊन निघालेल्या टेम्पोने समोरून येणाऱ्या ट्रकला धडक बसून झाला अपघात
बडोदा - लग्नाच्या वरातीसाठी जात असलेल्या टेम्पोला झालेल्या भीषण अपघातात 11 वऱ्हाड्यांचा मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी संध्याकाळी गुजरातमधील बडोद्याजळील रणू आणि महुवड गावांदरम्यान झाला. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
बडोदा जिल्ह्यात एका व्यक्तीची वरात निघाली होते. वऱ्हाडी मंडळी टेम्पोमधून प्रवास करत होते. दरम्यान, पदरा तालुक्यातील रणू आणि महुवडदरम्यान वऱ्हाड घेऊन निघालेल्या टेम्पोने समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्यास सुरुवात केली. तसेच अपघाताची माहिती पोलिसांनी दिली.
Vadodara: 11 dead and several injured in a collision between a truck and a tempo traveller on road connecting Ranu and Mahuvad. Injured have been admitted to hospital. #Gujarat
— ANI (@ANI) February 22, 2020
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. टेम्पोमध्ये अडकलेल्या वऱ्हाड्यांना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे 11 जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर जखमींवर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारांसाठी बडोदा येथे पाठवण्यात आले. सर्व जखमींवर बडोद्यातील सर सयाजी जनरल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संबंधित बातम्या
दररोज तीन अपघात ३३४ जणांचा मृत्यू
वर्षभरात एसटीचे ८१ अपघात ; नागपूर विभागातील स्थिती
एसटी बस - जीपची समोरासमोर धडक; पाच जण ठार, सहा जण जखमी
या अपघातासंदर्भात बडोद्याचे पोलीस अधीक्षक सुधीर देसाई यांना विचारले असता त्यांनी अपघाताचे नेमके कारण अद्याप समजले नसल्याचे सांगितले.