११ माजी खासदारांवर चालणार खटला, दोन पत्रकारांवरही ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 04:46 AM2017-12-08T04:46:26+5:302017-12-08T04:46:44+5:30

दिल्लीतील न्यायालयाने २००५ मधील कॅश फॉर क्वेरी (प्रश्न विचारण्यासाठी पैसे) घोटाळ्यात ११ माजी खासदारांविरुद्ध भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप निश्चित केले आहेत.

11 former MPs face trial, two journalists reprimand | ११ माजी खासदारांवर चालणार खटला, दोन पत्रकारांवरही ठपका

११ माजी खासदारांवर चालणार खटला, दोन पत्रकारांवरही ठपका

googlenewsNext

नवी दिल्ली : दिल्लीतील न्यायालयाने २००५ मधील कॅश फॉर क्वेरी (प्रश्न विचारण्यासाठी पैसे) घोटाळ्यात ११ माजी खासदारांविरुद्ध भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप निश्चित केले आहेत.
भाजपाचे तत्कालीन संसद सदस्य वाय.जी. महाजन, छत्रपाल सिंह लोढा, अण्णासाहेब एम. के. पाटील, चंद्र प्रताप सिंह, प्रदीप गांधी, सुरेश चंदेल, काँग्रेसचे रामसेवक सिंह, बसपाचे नरेंद्र कुशवाहा, लालचंद्र कोल, राजा रामपाल व राजदचे मनोज कुमार यांना आरोपी केले आहे.

सरकारी वकील अतुल श्रीवास्तव म्हणाले की, कोर्टाने बसपाचे राजा रामपाल यांचे तत्कालीन पीए रविंद्र कुमार यांच्यावर आरोप निश्चित केले. दिल्ली पोलिसांनी २००९ मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. दोन पत्रकारांचे नावही आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले होते. हा खटला १२ जानेवारी रोजी सुरूहोणार आहे.

Web Title: 11 former MPs face trial, two journalists reprimand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.