11 जणांना झाला दुर्मीळ आजार; भारत, ब्रिटनमधील तज्ज्ञांच्या स्वतंत्र संशोधनांचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 06:32 AM2021-06-24T06:32:43+5:302021-06-24T06:33:26+5:30

ऍस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्डची लस; भारत, ब्रिटनमधील तज्ज्ञांच्या स्वतंत्र संशोधनांचा निष्कर्ष

11 had a rare illness; Conclusions of independent research by experts in India, UK pdc | 11 जणांना झाला दुर्मीळ आजार; भारत, ब्रिटनमधील तज्ज्ञांच्या स्वतंत्र संशोधनांचा निष्कर्ष

11 जणांना झाला दुर्मीळ आजार; भारत, ब्रिटनमधील तज्ज्ञांच्या स्वतंत्र संशोधनांचा निष्कर्ष

Next

नवी दिल्ली/लंडन : देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे देशात लसीकरण मोहिमेला वेग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. लसीकरण अभियानात प्रामुख्याने कोविशिल्डचा वापर होत आहे. मात्र ऍस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्डची लस घेतलेल्या ११ जणांना दुर्मीळ आजार झाल्याची माहिती पुढे आली आहे. लस घेतलेल्या ११ जणांना गिलन बार सिंड्रोम हा मेंदूशी संबंधित आजार झाला आहे. भारत आणि ब्रिटनमधील तज्ज्ञांनी केलेल्या दोन स्वतंत्र संशोधनांतून ही बाब समोर आली आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

केरळमध्ये कोविशिल्डची लस घेतल्यानंतर सात जणांना गिलन बार सिंड्रोम आजार झाला. या व्यक्तींनी एकाच लसीकरण केंद्रातून लस घेतली होती. या लसीकरण केंद्रात आतापर्यंत जवळपास १२ लाख जणांचे लसीकरण झाले आहे. तर ब्रिटनमधील नॉटिंगहॅममध्ये चार जणांना गिलन बार सिंड्रोम आजार झाला आहे. या भागात एकूण ७ लाख लोकांना ऍस्ट्राझेनेकाची लस देण्यात आली आहे.

दहा ते बारा दिवसांपूर्वी घेतली होती लस

केरळमध्ये ७ तर नॉटिंगहॅममध्ये ४ जणांना गिलन बार सिंड्रोम आजार झाला आहे. या सगळ्यांनी १० ते २२ दिवसांपूर्वी कोविशिल्डची लस घेतली होती. गिलन बार सिंड्रोम आजार झाल्यानंतर शरीरातील रोगप्रतिकारशक्ती चुकून मेंदूच्या आणि पाठीच्या कण्याच्या बाहेर असलेल्या परिघीय मज्जासंस्थेवर आघात करू लागते.  याबद्दल केरळ आणि नॉटिंगहॅममधील तज्ज्ञांनी अभ्यास केला. याबद्दलचा अहवाल एका नियतकालिकात १० जूनला प्रसिद्ध झाला.

Web Title: 11 had a rare illness; Conclusions of independent research by experts in India, UK pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.