पिकअप पलटी होऊन भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू 7 जखमी
By महेश गलांडे | Published: February 1, 2021 09:10 AM2021-02-01T09:10:50+5:302021-02-01T09:11:39+5:30
कोरापुटच्या जिल्हाधिकारी मधुसूदन मिश्रा यांनी अपघाताची माहिती घेत सर्वोतोपरी मदतीचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
ओडिशातील कोरापुट जिल्ह्यात भीषण अपघाताची दुर्घटना घडली आहे. मुर्ताहांडीजवळ पिकअप वाहन पलटी झाल्याने हा अपघात झाला. त्यामध्ये, 11 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या पिकअप वाहनातून प्रवासी ओडिशातील सिंधीगुडा गावातून छत्तीसगडच्या कुलता या गावी निघाले होते. मात्र, रात्रीच्या अंधारात ही भीषण दुर्घटना घडली.
Odisha: Nine people died, 13 injured after a van overturned in Kotput, Koraput district.
— ANI (@ANI) January 31, 2021
"Passengers were travelling from Sindhiguda village in Odisha to Kulta village in Chhattisgarh. Injured have been shifted to the hospital for treatment," says Madhusudan Mishra, DM Koraput pic.twitter.com/3uPgOzACWR
कोरापुटच्या जिल्हाधिकारी मधुसूदन मिश्रा यांनी अपघाताची माहिती घेत सर्वोतोपरी मदतीचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जखमींपैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना जगदलपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
My thoughts are with all those who have lost their dear ones in the tragic accident at Koraput, Odisha. I hope those injured recover at the earliest: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 1, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेची दखल घेत ट्विट करुन मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत, त्यांच्या दु:खात सहभागी असल्याचे म्हटले आहे. जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे होतील, अशी आशा बाळगतो, असेही मोदींनी म्हटले.