गीरच्या जंगलात गेल्या 11 दिवसात 11 सिंहांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 09:23 AM2018-09-21T09:23:43+5:302018-09-21T09:25:11+5:30
गीरच्या जंगलात मागील 11 दिवसांमध्ये 11 सिंहांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
जुनागड - गीरच्या जंगलात मागील 11 दिवसांमध्ये 11 सिंहांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुजरात सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. वन अधिकाऱ्यांनी दलकहनियाजवळील परिसरात 11 सिंहांचे मृतदेह मिळाल्याची माहिती दिली आहे.
Junagadh: 11 lions have died in Gir forest in the past 11 days.H Vamja, veterinary officer says,'all of them have died due to lung infection. Cause of infection isn't known as yet. We're giving preventive medicines to other lions so that they don't get affected' #Gujarat(20.9.18) pic.twitter.com/pHL44DXqjQ
— ANI (@ANI) September 20, 2018
वन विभागाचे उप संरक्षक पी पुरुषोत्तम यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरेली जिल्ह्यातील राजुला भागात काही सिंहांचे मृतदेह बुधवारी मिळाले. तर त्यानंतर आणखी तीन सिंहांचे मृतदेह त्याच दिवशी दलकहनियाजवळ मिळाले. या सगळ्या मृतदेहांचा व्हिसेरा जुनागड येथील वन्य प्राण्यांच्या रूग्णालयात पाठवला आहे. या संदर्भातला अहवाल आल्यावरच हे मृत्यू का झाले याची माहिती मिळू शकेल असेही पुरुषोत्तम यांनी म्हटले आहे.
वन आणि पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव कुमार गुप्ता यांनी 11 सिंहांच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्य वन संरक्षांच्या अध्यक्षतेखाली ही नेमण्यात आलेली समिती यासंदर्भातली चौकशी करणार आहे. 11 पैकी 8 सिंहांचा मृत्यू हा आपसातील भांडणात एकमेकांवर केलेल्या हल्ल्यामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र तर इतर तीन सिंहांचा मृत्यू कसा झाला याबाबत अहवाल आल्यावरच कळेल असेही ते म्हणाले.