ओडिशात ११ लाख लोकांचे केले स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 02:59 AM2019-05-03T02:59:46+5:302019-05-03T03:00:19+5:30
फोनी : नागरी उड्डयनमंत्री सुरेश प्रभू यांनी विमानतळ अधिकाऱ्यांना सावध राहण्याचे दिले निर्देश
नवी दिल्ली : चक्रीवादळ फोनीपासून सुरक्षित राहण्यासाठी सर्व विमानतळांच्या अधिकाऱ्यांनी सावध राहावे, असे आवाहन नागरी विमान उड्डयनमंत्री सुरेश प्रभू यांनी केले आहे. दरम्यान, ओडिशात फोनी चक्रीवादळ शुक्रवारी धडकणार असून, ११ लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.
फोनी चक्रीवादळ ओडिशाच्या किनारी भागात शुक्रवारी प्रवेश करण्याची शक्यता आहे. या भागात या चक्रीवादळाची तीव्रता अधिक असू शकते. पूर्व समुद्रकिनारी भाग पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूलाही या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रभू यांनी टष्ट्वीट केले आहे की, संबंधित सर्व अधिकाºयांनी सावध राहण्याबाबत सूचना करण्यात आली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सर्व समुद्रकिनारी भागातील विमानतळांना सावध केले आहे.
चक्रीवादळामुळे ८९ रेल्वे रद्द
फोनी चक्रीवादळाने जवळपास ८९ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत, तर पर्यटकांसाठी तीन विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे. या चक्रीवादळाने ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील काही भागांना फटका बसू शकतो. हे चक्रीवादळ शुक्रवारी ओडिशात पुरीच्या दक्षिण भागात धडकण्याची शक्यता आहे.
रेल्वेने म्हटले आहे की, जर प्रवासाच्या तीन दिवस अगोदर तिकीट रद्द केले गेले तर प्रवाशांना रुट बदलणाºया रेल्वेसाठी तिकिटाचे पूर्ण पैसे परत दिले जातील. तथापि, या भागातील प्रवाशांना परत आणण्यासाठी तीन पर्यटक रेल्वेची घोषणा करण्यात आली आहे. एक विशेष रेल्वे १२ वाजता पुरीहून सुरू होईल.
कोलकाता, भुुवनेश्वरहून होणारी आजची उड्डाणे रद्द
नागरी उड्डयण महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, फनी चक्रीवादळामुळे आज ३ मे रोजी कोलकाता विमानतळावरुन रात्री ९.३० ते ४ मे रोजी सायंकाळी ४ पर्यंत कोणत्याही विमानाचे उड्डाण किंवा लँडिंग होणार नाही. तसेच, भुवनेश्वर येथून ३ मे रोजी कोणत्याही विमानाचे उड्डाण होणार नाही.