राजस्थानमध्ये बसची ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक, 11 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 09:47 PM2018-01-03T21:47:26+5:302018-01-03T21:55:52+5:30

सिकर येथील राष्ट्रीय महामार्गावर बसची धडक ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला बसल्याने 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी पाचच्या सुमारास घडली. तर या दुर्घटनेत 12 जण जखमी झाले आहेत. 

11 people killed in road accident in Rajasthan, tractor trawlers | राजस्थानमध्ये बसची ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक, 11 जणांचा मृत्यू

राजस्थानमध्ये बसची ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक, 11 जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देबसची धडक ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला बसल्याने 11 जणांचा मृत्यू 12 जण जखमी, जखमींपैकी 5 जण गंभीर मृतांच्या नातेवाईकांना जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत

जयपूर : सिकर येथील राष्ट्रीय महामार्गावर बसची धडक ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला बसल्याने 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी पाचच्या सुमारास घडली. तर या दुर्घटनेत 12 जण जखमी झाले आहेत. 
सिकर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 11 वर रोलसाहबसर आणि फतेहपूरच्या दरम्यान एका  बसला ओव्हरटेक करणाचा प्रयत्न करणा-या बसची धडक रस्त्याच्या बाजूने जाणा-या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला बसली. या अपघातात बसच्या चालका आणि वाहकासह 11 प्रवाशांचा जणांचा मृत्यू झाला. तर 12 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमी झालेल्या प्रवाशांना सिकर आणि जयपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी 5 जण गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भयंकर होता की, बसची ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक बसल्यानंतर बसचे मोठे नुकसान झाले. ही घटना बुधवारी सकाळी पाचच्या सुमारास घडली. 
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सिकरचे जिल्हाधिकारी नरेश कुमार आणि पोलीस अधिकारी विनित कुमार यांच्यासह स्थानिक लोकांनी मदतकार्य सुरु केले. तसेच, या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.  राज्यस्थानमध्ये अपघाताची ही दुसरी घटना आहे. याआधी जयपूरमधील रेनवाल येथे टेम्पो आणि ट्रकचा यांच्यात अपघात झाला. या अपघात आठ जणांचा मृत्यू झाला असून सहा जखमी झाले आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली. 

Web Title: 11 people killed in road accident in Rajasthan, tractor trawlers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात