आजपासून होणार महत्त्वपूर्ण वित्तीय ११ बदल; ६ अंकी हॉलमार्क बंधनकारक, वाहने महाग हाेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 06:40 AM2023-04-01T06:40:12+5:302023-04-01T06:40:25+5:30

१ एप्रिलपासून वित्त वर्ष २०२३-२४ सुरू होत आहे.

11 significant financial changes from today; 6 digit hallmark mandatory, vehicles will be expensive | आजपासून होणार महत्त्वपूर्ण वित्तीय ११ बदल; ६ अंकी हॉलमार्क बंधनकारक, वाहने महाग हाेणार

आजपासून होणार महत्त्वपूर्ण वित्तीय ११ बदल; ६ अंकी हॉलमार्क बंधनकारक, वाहने महाग हाेणार

googlenewsNext

नवी दिल्ली : १ एप्रिलपासून वित्त वर्ष २०२३-२४ सुरू होत आहे. या नव्या वित्त वर्षात ११ महत्त्वपूर्ण वित्तीय बदल होत आहेत. यात सराफा बाजारात केवळ ६ अंकी हॉलमार्कचे सोनेच विकले जाणे, तसेच पेनकिलर आणि अँटीबायोटिक्स औषधी महाग हाेणे यांचा समावेश आहे. 

नवी आयकर प्रणाली  

करदात्यांना नवी आयकर व्यवस्था मिळेल. यात कर सवलत ७ लाख रुपये करण्यात आली आहे. आधी ती ५ लाख रुपये होती. ५० हजारांच्या स्थायी वजावटीची सोय तिच्यात आहे. त्यामुळे नोकरदारांना ७.५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही.

सोने महागणार 

सोने व इमिटेशन ज्वेलरीवरील आयात कर २० टक्क्यांवरून २५% तर चांदीवरील आयात कर १.५ टक्क्यांवरून १६ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे सोन्यासह सर्व दागिने महागतील.

६ अंकी हॉलमार्क बंधनकारक 

सोन्याच्या दागिन्यांवर ६ अंकी हॉलमार्क बंधनकारक करण्यात आला आहे. त्याशिवाय त्यांना दागिने विकता येणार नाहीत.

पंतप्रधान वय वंदना योजना बंद 

पंतप्रधान वय वंदना योजना बंद होईल. ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांसाठी ही एकरकमी हप्त्याची पेन्शन योजना होती.

विना पॅन पीएफ काढण्यावरील करात कपात 

पॅन क्रमांक जोडलेला नसलेल्या खात्यातून पीएफ काढल्यास ३०% टीडीएस कापला जात होता. १ एप्रिलपासून २०%च कापला जाईल. 

ज्येष्ठ नागरिक बचत   

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत कमाल ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल. आधी ही मर्यादा १५ लाख रुपये होती. या योजनेत वार्षिक ८% व्याज मिळते.

महिला सन्मान योजना

‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ योजना १ एप्रिलपासून सुरू होईल. यात महिला २ वर्षांसाठी २ लाख रुपये गुंतवू शकतील. त्यावर ७.५ टक्के व्याज मिळेल.

औषधी महाग हाेणार

सरकारने औषधांच्या किमती १० टक्क्यांपर्यंत वाढविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे वेदनाशामके व प्रतिजैविके यांसह ३०० पेक्षा अधिक औषधी महाग होतील. 

डेट फंडावरील एलटीसीजी सवलत बंद

डेट म्युच्युअल फंडावरील दीर्घकालीन लाभ करातील (एलटीसीजी) सवलत बंद होईल. त्यामुळे त्यावर टॅक्स स्लॅबच्या हिशेबाने कर लागेल.

घरगुती एलपीजी सिलिंडर 

प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीचा आढावा घेतला जातो. १ एप्रिल रोजी गॅसच्या दरात बदल होऊ शकतो.

वाहने महाग हाेणार

बीएस६ च्या दुसऱ्या टप्प्यातील उत्सर्जन नियम लागू होतील. त्यामुळे सर्व  गाड्या महागतील.

Web Title: 11 significant financial changes from today; 6 digit hallmark mandatory, vehicles will be expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.