भारतीय लष्कराच्या फारशा ज्ञात नसलेल्या ११ गोष्टी

By admin | Published: February 8, 2017 01:11 AM2017-02-08T01:11:17+5:302017-02-08T01:11:17+5:30

भारतीय लष्कराचे आपण खूप काही देणे लागतो. आपले जवान डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण करीत असल्यामुळे आपण रात्री शांतपणे झोपू शकतो.

The 11 things that are not known by the Indian Army are too much | भारतीय लष्कराच्या फारशा ज्ञात नसलेल्या ११ गोष्टी

भारतीय लष्कराच्या फारशा ज्ञात नसलेल्या ११ गोष्टी

Next

भारतीय लष्कराचे आपण खूप काही देणे लागतो. आपले जवान डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण करीत असल्यामुळे आपण रात्री शांतपणे झोपू शकतो. आपले लष्कर शौर्याचे मूर्तिमंत रूप आहे. तथापि, आपल्या लष्कराविषयी अनेक गोष्टी आपणास ठाऊक नाहीत. चला तर मग जाणून घेऊ या आपल्या लष्कराविषयी...

१७७६ मध्ये स्थापना
भारतीय लष्कर १७७६ मध्ये अस्तित्वात आले. ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारने कोलकात्यात ‘इंडियन आर्मी’ची मुहूर्तमेढ रोवली होती. ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात भारतीयांची भरती करून त्यांना युरोपियन पद्धतीचे प्रशिक्षण दिले. तथापि, खासगी कंपनीचे सुरक्षा दल असे त्याचे प्रारंभीचे स्वरूप होते. भारताचे राष्ट्रपती लष्कराचे कमांडर इन चीफ असतात. तथापि, वास्तविक नेतृत्व संरक्षणमंत्र्यांकडे असते. ‘चीफ आॅफ आर्मी स्टॉफ’ हे लष्कराचे प्रमुख असतात.

लष्कराचा आकार
भारतीय लष्कराच्या संपूर्ण देशभरात ५३ छावण्या आणि नऊ लष्करी तळे आहेत. जगातील मोठ्या लष्करात समावेश होणाऱ्या भारतीय लष्करात ११ लाख २९ हजार ९०० सक्रिय सैनिक असून, ९ लाख ६० हजारांवर राखीव जवान आहेत.

लष्करात स्वेच्छेने भरती
भारतीय लष्कर जगातील सर्वात मोठे स्वयंसेवी लष्कर आहे. जगात स्वेच्छेने लष्करात सहभागी झालेले सर्वाधिक सैनिक आपल्याकडे असून ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे.

जंगल युद्धनीतीत निपुण
भारतीय लष्कराचे जवान जंगल युद्धनीतीतील निपुणतेसाठी प्रसिद्ध आहेत. जंगलात युद्ध कसे करायचे याचे कसब आत्मसात करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, रशियासह इतर देशांचे जवान भारतीय लष्कराचा दहशतवाद प्रतिबंधक विभाग आणि जंगल युद्धनीती विभागाला भेट देतात.

जगातील उंच युद्धभूमीवर मर्दुमकी
समुद्रसपाटीपासून ५००० मीटर उंचीवर असलेले सियाचीन ग्लेशियर ही जगातील सर्वात उंच युद्धभूमी असून, भारतीय जवानांचे तेथे नियंत्रण आहे.

आसाम रायफल्स
आसाम रायफल्स हे भारतातील सर्वात जुने निमलष्करी दल आहे. १८३५ मध्ये त्याची स्थापना करण्यात आली होती.

शांतता मोहिमांत योगदान
संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युएन) जगभरातील शांतता मोहिमांसाठी सर्वाधिक शांतता जवान भारताकडून पुरविले जातात. आजही जगात विविध ठिकाणी सुरू असलेल्या शांतता मोहिमांत भारतीय जवान मोलाची भूमिका बजावत आहेत.

सर्वात उंच पुलाची उभारणी
भारतीय लष्कराने १९८२ मध्ये लडाखमध्ये जगातील सर्वात उंच पुलाची उभारणी केली. हा पूल बेली पद्धतीचा आहे. हिमालयातील द्रास आणि सुरू नदीदरम्यान बांधण्यात आलेला हा पूल लडाखमधील एक पर्यटनस्थळ म्हणून पुढे येत आहे.

राष्ट्रपतींचे अंगरक्षक
राष्ट्रपतींचे अंगरक्षक ही भारतीय लष्कराची सर्वात जुनी चिलखती पलटण आहे. १७७३ मध्ये स्थापन करण्यात आलेली ही पलटण राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे तैनात असते.

घोडदळ असलेला देश
भारतीय लष्कराकडे घोडदळ आहे. जगात केवळ तीन लष्कराकडेच घोडदळ आहे.

सर्वात मोठी बांधकाम संस्था
लष्करी अभियांत्रिकी सेवा (एमईएस) ही भारतातील सर्वात मोठी बांधकाम संस्था आहे.

Web Title: The 11 things that are not known by the Indian Army are too much

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.