तोंडात केरोसिन भरुन टीव्हीवरील स्टंट करण्याच्या नादात चिमुरड्याने गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 04:26 PM2017-08-04T16:26:09+5:302017-08-04T16:28:31+5:30

रिअॅलिटी शोमधील स्टंट करण्याच्या नादात 11 वर्षाच्या मुलाने आपला जीव गमावला असल्याची घटना समोर आली आहे

11 year old boy died while performing reality show stunt | तोंडात केरोसिन भरुन टीव्हीवरील स्टंट करण्याच्या नादात चिमुरड्याने गमावला जीव

तोंडात केरोसिन भरुन टीव्हीवरील स्टंट करण्याच्या नादात चिमुरड्याने गमावला जीव

Next

हैदराबाद, दि. 4 - रिअॅलिटी शोमधील स्टंट करण्याच्या नादात 11 वर्षाच्या मुलाने आपला जीव गमावला असल्याची घटना समोर आली आहे. तेलंगणामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. रापल्ले काली विश्वनाथ असं या मुलाचं नाव आहे. तो सहावीमध्ये शिकत होता. रिअॅलिटी शोमध्ये अनेकदा स्टंट तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले जात असून त्यांना घरी कॉपी करण्याचा प्रयत्न करु नका असं नेहमी सांगण्यात येतं. मात्र तरीही अशा घटना अनेकदा समोर येत असतात. 

मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपुर्वी त्याने टीव्हीवर रात्री उशिरा आगीचा एक स्टंट पाहिला होता. तो स्टंट कॉपी करण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयोग फसला आणि आपला जीव गमवावा लागला. 

रापल्लाने आगीचे गोळे काढण्यासाठी सर्वात आधी तोंडात केरोसिन भरलं. यानंतर ज्याप्रमाणे सर्कसमध्ये तोंडातून केरोसिन उडवत आगीचे गोळे काढले जातात तसा प्रयत्न केला. मात्र हा स्टंट करत असताना त्याच्या शऱिराने पेट घेतला. यानंतर त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. नंतर त्याला हैदराबादला हलवण्यता आलं. शुक्रवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. 

रापल्ले बोर्डिंग शाळेत शिक्षण घेत होता. आपल्या आजीसोबत सुट्ट्या घालण्यासाठी तो आला होता. तो एक हुशार विद्यार्थी होता, त्याला नेहमी नवीन गोष्टींचं कुतुहूल वाटत असे असं त्याच्या पालकांनी सांगितलं आहे. जेव्हा कधी टीव्हीवर तो एखादा स्टंट पाहत असे, तेव्हा घरी कोणीही नसताना तो ते करुन पाहत असे असंही त्याच्या पालकांनी सांगितलं आहे. चार महिन्यांपुर्वी अशाच प्रकारे करिमानगर येथे सहावीतील विद्यार्थ्याचा स्टंट करताना मृत्यू झाला होता. 

Web Title: 11 year old boy died while performing reality show stunt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.