११ वर्षीय चिमुरडीचे बलात्का-यासोबत लावले लग्न !
By admin | Published: March 31, 2015 06:30 PM2015-03-31T18:30:58+5:302015-03-31T18:38:10+5:30
बलात्कारी नराधमाला शिक्षा देण्याऐवजी त्या चिमुरडीचे बलात्का-यासोबत लग्न लावून देण्यात आल्याचा धक्कादायक व संतापजनक प्रकार उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये उघडकीस आला आहे.
ऑनलाइन लोकमत
बुलंदशहर, दि. ३१ - एका २८ वर्षीय नराधमाने ११ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केला, बलात्कारी नराधमाला शिक्षा देण्याऐवजी त्या चिमुरडीचे बलात्का-यासोबत लग्न लावून देण्यात आल्याचा धक्कादायक व संतापजनक प्रकार उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये उघडकीस आला आहे.
बुलंदशहरमधील औरंगाबाद येथे राहणा-या एका नराधमाने त्याच परीसरात राहणा-या ११ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. काही दिवसानंतर ती मुलगी गर्भवती असल्याचे तिच्या पालकांच्या लक्षात आले. बलात्कार करणा-या नराधमाला याबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर त्याने सारवासारव करीत मुलगी आपल्या प्रेमात पडल्याचे सांगितले. या घटनेची माहिती तेथील मुस्लीम धर्मगुरुला सांगितली असता मुलीचे लग्न त्या बलात्का-यासोबत लावून देण्याचा सल्ला धर्मगुरुने मुलीच्या पालकांना दिला. बलात्कारी मुलानेही त्याला होकार दर्शवल्याने मुलीचे लग्न बलात्का-यासोबत लावून देण्यात आले. मुलगी अल्पवयीन असून सुध्दा तिचे लग्न लावून देण्यात आले असून याबाबत अद्याप कोणाविरुध्दही पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला नाही.