वर्षभरात ८२२ दंगलींत १११ जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 04:13 AM2018-02-08T04:13:41+5:302018-02-08T04:13:47+5:30
देशामध्ये २०१७ साली ८२२ जातीय दंगलींमध्ये १११ जण ठार व २३८४ जण जखमी झाल्याची माहिती लोकसभेत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. सर्वाधिक दंगली उत्तर प्रदेशात झाल्या आणि मृतांची संख्याही त्याच राज्यात अधिक आहे.
नवी दिल्ली : देशामध्ये २०१७ साली ८२२ जातीय दंगलींमध्ये १११ जण ठार व २३८४ जण जखमी झाल्याची माहिती लोकसभेत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. सर्वाधिक दंगली उत्तर प्रदेशात झाल्या आणि मृतांची संख्याही त्याच राज्यात अधिक आहे.
अहीर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, गेल्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त जातीय दंगली झाल्या. या राज्यात १९५ दंगलींमध्ये ४४ जण ठार व ५४२ जण जखमी झाले. कर्नाटकमध्ये १०० जातीय दंगली झाल्या. त्यात नऊ लोक ठार व २२९ जण जखमी झाले. राजस्थानमध्ये ९१ जातीय दंगलींमध्ये १२ जण ठार व १७५ जण जखमी झाले. बिहारमध्ये गेल्या वर्षी ८५ जातीय दंगलींमध्ये तीन जण ठार व ३२१ जण जखमी झाले. त्याखालोखाल मध्य प्रदेशमध्ये अशा ६० दंगलींमध्ये नऊ जण ठार व १९१ जण जखमी झाले. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या ५८ जातीय दंगलींमध्ये नऊ जण ठार व २३० जण जखमी झाले. गुजरातमध्ये गेल्या वर्षी ५० जातीय दंगलींमध्ये आठ जण ठार व १२५ जण जखमी झाले.
>जातीय दंगलींत झाली वाढ
हंसराज अहीर म्हणाले की, २०१५ साली ७५१ जातीय दंगलींमध्ये ९७ जण ठार व २२६४ जण जखमी झाले होते.
२०१६ साली देशामध्ये ७०३ जातीय दंगलींमध्ये ८६ जण ठार व २३२१ जण जखमी झाले होते.
२०१५ व २०१६ या दोन वर्षांपेक्षा २०१७ साली देशात जातीय दंगलींचे प्रमाण वाढलेले आहे.