११२ एकच इमर्जन्सी नंबर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2016 04:22 AM2016-05-09T04:22:17+5:302016-05-09T04:22:17+5:30

देशभरात एकच इमर्जन्सी नंबर ‘११२’ १ जानेवारी २०१७पासून कार्यान्वित होणार आहे. या एकाच नंबरवरून लोकांना पोलीस, रुग्णवाहिका किंवा अग्निशामक विभागाची मदत उपलब्ध होईल.

112 One Emergency Number! | ११२ एकच इमर्जन्सी नंबर!

११२ एकच इमर्जन्सी नंबर!

googlenewsNext

नवी दिल्ली : देशभरात एकच इमर्जन्सी नंबर ‘११२’ १ जानेवारी २०१७पासून कार्यान्वित होणार आहे. या एकाच नंबरवरून लोकांना पोलीस, रुग्णवाहिका किंवा अग्निशामक विभागाची मदत उपलब्ध होईल. दूरसंचारमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सर्व आपत्कालीन सेवांसाठी एकाच नंबरच्या तरतुदीला मंजुरी दिली आहे. अमेरिकेत अशा प्रकारचा एकच नंबर (९११) कार्यान्वित आहे. त्याच धर्तीवर भारतात एकच नंबर कार्यान्वित केला जाईल.ज्या मोबाईल आणि लॅण्डलाईनची आऊटगोर्इंग सेवा खंडित केली आहे, अशा फोनवरूनही ही सेवा उपलब्ध होईल. त्यामुळे अडचणीत असलेली कोणतीही व्यक्ती ‘११२’ वर कॉल करू शकेल. त्याचा कॉल तात्काळ संबंधित विभागाकडे हस्तांतरित केला जाईल. एकदा ‘११२’ हा क्रमांक कार्यान्वित झाल्यानंतर सध्या अस्तित्वात असलेले सर्व आपत्कालीन नंबर हळूहळू बंद होतील.एखादी व्यक्ती एसएमएसद्वारेही आपले म्हणणे मांडू शकेल. ही प्रणाली कॉलरच्या स्थळाचा शोध घेईल व ती माहिती नजीकच्या केंद्राला कळवेल. लोक ११२ या नंबरला ‘पॅनिक बटन’ प्रणालीत फ ीड करू शकतात.

Web Title: 112 One Emergency Number!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.