चुकून खात्यात आले ११,६७७ कोटी, डोकं चालवून त्यावर कमावले पाच लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 05:24 AM2022-09-20T05:24:30+5:302022-09-20T05:25:01+5:30
सगर यांच्या डीमॅट खात्यावर अचानक ११,६७७ कोटी रुपये आले. सगर हे छोटे शेअर व्यावसायिक आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : गुजरातमधील अहमदाबाद येथील एका व्यक्तीच्या खात्यात चुकून ११,६७७ कोटी रुपये जमा झाले. काही तासांत हे पैसे परतही गेले. मात्र, तेवढ्या वेळात त्याने २ कोटी रुपयांची गुंतवणूक करून ५ लाख रुपये कमावले.
सगर यांच्या डीमॅट खात्यावर अचानक ११,६७७ कोटी रुपये आले. सगर हे छोटे शेअर व्यावसायिक आहेत. २६ जुलैच्या सकाळी ९.३० वाजता ते ट्रेडिंगसाठी बसले. त्यांनी २-३ व्यवहारही केले आणि अचानक त्यांच्या खात्यात ११,६७७ कोटी रुपये जमा झाले. हे पैसे थोड्याच वेळात परत जातील, हे सगर यांना माहीत होते. त्यांनी डोके लावले आणि पटापट २ कोटी रुपये वेगवेगळ्या चांगल्या शेअर्समध्ये गुंतवून ट्रेडिंग केले. त्याआधीची त्यांची सर्वाधिक मोठी गुंतवणूक अवघी २५ हजार रुपयांची होती. या ट्रेडिंगमधून त्यांना ५.६४ लाख रुपयांचा फायदा झाला. त्यानंतर थोड्याच वेळात सर्व रक्कम आली तशी परत गेली.