पंतप्रधान मोदींच्या परदेश दौ-यावर 117 कोटी खर्च
By admin | Published: May 6, 2016 12:14 PM2016-05-06T12:14:09+5:302016-05-06T12:14:09+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौ-यावर 117 कोटी खर्च झाल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे, लोकेश बत्रा यांनी आरटीआयमार्फेत ही माहिती मागितली होती
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 06 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौ-यावर 117 कोटी खर्च झाल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे. गतवर्षीपेक्षा 25 टक्यांनी हा खर्च वाढला आहे. मोदींनी 2015 मध्ये एकूण 22 देशांचा दौरा केला आहे. ज्यामध्ये रशिया, फ्रान्स, जर्मनी, कोरिया, मंगोलिया, चीन, दुबई, आयर्लंड, पाकिस्तान, ब्रिटन, अफगाणिस्तान आणि टर्की या देशांचा समावेश आहे . 2015 शी तुलना करता 2013 मध्ये परदेश दौ-यावर 108 कोटींचा खर्च करण्यात आला होता.
लोकेश बत्रा यांनी आरटीआयमार्फेत ही माहिती मागितली होती. डिसेंबर अखेरपर्यंत मोदींच्या परदेश दौ-यावर 117 कोटी खर्च झाले असून 2014-15मध्ये 94 कोटी खर्च झाल्याचं एअर इंडियाने सांगितलं आहे. मोदींनी सत्तेत आल्यानंतर सुरुवातीला 12 देशांचा दौरा केला होता ज्यामध्ये भुतान, ऑस्ट्रेलिया, म्यानमार, फिजी, जापान, ब्राझील आणि मॉरिशिअस या देशांचा समावेश होता.
पंतप्रधान मोदींचा एप्रिल 2015 मधील परदेश दौरा सर्वात महागडा ठरला आहे. यावेळी त्यांनी कॅनडा, जर्मनी आणि फ्रान्सचा दौरा केला होता. या दौ-यावर 31 कोटी खर्च झाले होते. या दौ-यात अनेक करार झाले होते. चीन, मंगोलिया आणि कोरियाच्या दौ-यावर 15 कोटी खर्च झाले होते.
पाकिस्तानचा अचानक दौरा करुन मोदींनी सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नातीच्या लग्नाला उपस्थित लावण्यासाठी मोदींनी कोणालाही न कळवता अचानकपणे पाकिस्तानचा दौरा केला होता. एअर इंडियाने या दौ-यावर किती खर्च झाला याची माहिती दिलेली नाही.
2016 मध्ये आतापर्यंत मोदींनी बेल्जिअम, अमेरिका आणि सौदी अरेबियाचा दौरा केला असून येत्या महिन्यात इराणचा दौरा करण्याची शक्यता आहे. जूनमध्ये पुन्हा अमेरिकेच्या दौ-यावर मोदी जाणार आहेत.