ऑस्ट्रेलियात ११ वे हिंदू मंदिर भाविकांसाठी खुले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 06:14 AM2023-09-25T06:14:13+5:302023-09-25T06:15:22+5:30

दोन दिवस हा सोहळा साजरा करण्यात आला.

11th Hindu temple opens for devotees in Australia | ऑस्ट्रेलियात ११ वे हिंदू मंदिर भाविकांसाठी खुले

ऑस्ट्रेलियात ११ वे हिंदू मंदिर भाविकांसाठी खुले

googlenewsNext

मेलबोर्न : ऑस्ट्रेलियात आता ११ वे हिंदूमंदिर खुले झाले आहे. टाऊन्सविले, क्वीन्सलँड येथे बीएपीएस स्वामीनारायण संप्रदायाचे प्रमुख, भक्त आणि हितचिंतक यांच्या उपस्थितीत नवीन बीएपीएस मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. दोन दिवस हा सोहळा साजरा करण्यात आला.

२ सप्टेंबर रोजी, टाऊन्सविलेचे महापौर जेनी हिल आणि क्वीन्सलँडचे पोलिस निरीक्षक जॅकी हनीवुड  यांनी त्यांच्या विभागातील इतर अधिकाऱ्यांसह टाऊन्सविले एस्प्लनेडच्या बाजूने दीड किलोमीटरच्या मूर्तींच्या भव्य मिरवणुकीत भाग घेतला. संध्याकाळी बीएपीएस मंदिराच्या उद्घाटनानिमित्त स्वामींनी आणि तरुणांनी भक्तिगीते गायली. ३ सप्टेंबरच्या सकाळी बीएपीएस भक्त आणि टाऊन्सविले येथील स्थानिक हिंदू समुदायाच्या सदस्यांनी वैदिक महापूजेत भाग घेतला. यानंतर परमचिंदनदास स्वामी व इतर स्वामींच्या हस्ते वैदिक मंदिर उद्घाटन विधी पार पडला.

अन्नकूट अर्पण
मंदिराच्या उद्घाटनावेळी पार पडलेल्या सर्व पवित्र संस्कारांनंतर, दैवी मूर्तींना भव्य नैवेद्य (अन्नकूट) अर्पण करण्यात आला. यापूर्वी १२ जानेवारी २०२२ रोजी अटलादरा येथील मूर्तींच्या वैदिक मूर्ती अभिषेक विधीत महंत स्वामी महाराज सहभागी झाले होते. कार्यक्रमातील सन्माननीय पाहुण्यांमध्ये संयुक्त स्थायी समितीचे उपाध्यक्ष फिलिप थॉम्पसन आणि टाऊनवेचे माजी लोकप्रतिनिधी आणि एलएनपी उमेदवार नताली मार यांचाही समावेश होता.

Web Title: 11th Hindu temple opens for devotees in Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.