ओडिशात भूस्खलनाने १२ मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 02:18 AM2018-10-14T02:18:59+5:302018-10-14T02:19:35+5:30

चार बेपत्ता : तितली चक्रीवादळ, मुसळधार पावसानंतर नवे संकट

12 dead in landslide in Odisha | ओडिशात भूस्खलनाने १२ मृत्युमुखी

ओडिशात भूस्खलनाने १२ मृत्युमुखी

Next

भुवनेश्वर : ओडिशात गजपती जिल्ह्यात तितली चक्रीवादळानंतर झालेल्या मुसळधार पावसाने भूस्खलन होऊन किमान १२ जण मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच चार जण बेपत्ता आहेत.


विशेष मदत आयुक्त बी.पी. सेठी यांनी सांगितले की, शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर काही ग्रामस्थ एका गुहेसारख्या जागेत आश्रयाला थांबले होते. गजपती जिल्ह्याच्या बरघारा गावात झालेल्या या दुर्घटनेत भूस्खलन होऊन १२ जण मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त होत आहे. बेपत्ता चार जण ढिगाऱ्याखाली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. अधिकाºयांनी सांगितले की, घटनास्थळी एनडीआरएफच्या टीमला पाठविण्यात आले आहे. तथापि, अन्य भागात पाणी ओसरु लागल्याने मदतकार्याला वेग आला आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक गंजम, गजपती आणि रायगड जिल्ह्यासह अन्य प्रभावित भागांची हवाई पाहणी करणार आहेत.


सेठी यांनी सांगितले की, आतापर्यंत १,२७,२६२ नागरिकांना शिबिरांत आश्रय देण्यात आला आहे. एनडीआरएफ आणि ओडिशा डिझास्टर रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सला मदतीसाठी तैनात करण्यात आले आहे. पुराचा फटका गंजम, गजपती,
रायगड, पुरी, कंधमाल आणि केंद्रपाडा जिल्ह्यांना बसला आहे. 


मुलींचे नाव तितली

भुवनेश्वर / बेरहमपूर : ओडिशात तितली चक्रीवादळाने हाहाकार उडविलेला असताना या संकटाच्या आठवणी अनेक जणांनी कायमस्वरूपी जतन करण्याचे ठरविले आहे. म्हणून, अनेक पालकांनी या काळात जन्मलेल्या मुलीचे नाव ‘तितली’ ठेवले आहे. गंजम, जगत्सिंहपूर आणि नयागढ येथील अनेक मुलींचे नाव तितली ठेवले आहे.

Web Title: 12 dead in landslide in Odisha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.