स्पाईसजेटचे १२ प्रवासी टर्ब्युलन्समुळे गंभीर जखमी; लँडिगदरम्यान दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 10:44 PM2022-05-01T22:44:46+5:302022-05-01T22:48:51+5:30

विमान लँड होताच जखमी प्रवाशांना देण्यात आले वैद्यकीय उपचार; स्पाईसजेटकडून दिलगिरी व्यक्त

12 flyers severely injured as SpiceJet flight encounters serious turbulence while landing in Durgapur | स्पाईसजेटचे १२ प्रवासी टर्ब्युलन्समुळे गंभीर जखमी; लँडिगदरम्यान दुर्घटना

स्पाईसजेटचे १२ प्रवासी टर्ब्युलन्समुळे गंभीर जखमी; लँडिगदरम्यान दुर्घटना

Next

मुंबई: स्पाईसजेटचे १२ प्रवासी विमान प्रवासादरम्यान जखमी झाले आहेत. मुंबईहून उड्डाण केलेलं विमान दुर्गापूरच्या विमानतळावर उतरत असताना हा प्रकार घडला. टर्ब्युलन्सची तीव्रता अधिक असल्यानं १२ प्रवाशांना गंभीर इजा झाली आहे. 

स्पाईसजेटच्या ताफ्यातलं बोईंग ७३७ विमान मुंबईहून दुर्गापूरसाठी रवाना झालं. दुर्गापूरमध्ये विमान सुरक्षित उतरलं. मात्र लँडिंगदरम्यान टर्ब्युलन्समुळे १२ प्रवासी जखमी झाले. विमान लँड होताच त्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली, अशी माहिती वरिष्ठ हवाई वाहतूक अधिकाऱ्यांनी दिली.




स्पाईसजेटच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मे २०२२ रोजी स्पाईसजेटचं एसजी-९४५ क्रमांकाचं विमान मुंबईहून दुर्गापूरला जाण्यासाठी झेपावलं. लँड होताना टर्ब्युलन्समुळे काही प्रवासी जखमी झाले. त्यांना दुर्गापूरमध्ये तातडीनं वैद्यकीय सहाय्य देण्यात आलं. या घटनेबद्दल स्पाईसजेटकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.

Web Title: 12 flyers severely injured as SpiceJet flight encounters serious turbulence while landing in Durgapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.