बांगलादेशात हिंसाचारात १२ ठार, २०० जखमी
By admin | Published: May 30, 2016 03:11 AM2016-05-30T03:11:40+5:302016-05-30T03:11:40+5:30
बांगलादेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शनिवारी दोन उमेदवारांसह १२ जण ठार, तर २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले
Next
ढाका : बांगलादेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शनिवारी दोन उमेदवारांसह १२ जण ठार, तर २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले. निवडणुकीत एवढा हिंसाचार प्रथमच झाला आहे.
जमालपूर चित्तगाँग, नोआखली, कोमिला, पंचगढ आणि नारायणगंज येथे माणसे मरण पावली. जखमींपैकी बुहतेक जण हे बंदुकीच्या गोळ्या लागलेले आहेत. देशात ४५ जिल्ह्यांतील ७१७ परिषदांच्या निवडणुकांत उमेदवारांचे पाठीराखे यांच्यात हिंसाचार झाला. या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून १०० पेक्षा जास्त जण ठार झाले आहेत.