जीएसटीला उशीर झाल्याने देशाचे 12 लाख कोटींचे नुकसान
By admin | Published: March 29, 2017 02:10 PM2017-03-29T14:10:24+5:302017-03-29T14:49:03+5:30
देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या वस्तू आणि सेवा कराशी (जीएसटी) संबंधित चार विधेयकांवर लोकसभेत चर्चा सुरु झाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या वस्तू आणि सेवा कराशी (जीएसटी) संबंधित चार विधेयकांवर लोकसभेत चर्चा सुरु झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी हे विधेयक लोकसभेत मांडले. सेंट्रल जीएसटी, इंटिग्रेटेड जीएसटी, युनियन टेरिटरी जीएसटी आणि नुकसान भरपाई कायद्यावर संसदेमध्ये आज सहातास मॅरेथॉन चर्चा होणार आहे.
येत्या 1 जुलैपासून जीएसटी कररचना लागू करण्याचे मोदी सरकारचे लक्ष्य आहे. जीएसटी क्रांतिकारी विधेयक असून याचा सर्वांना फायदा होईल. जीएसटी लागू करण्याचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी जीएसटी परिषदेच्या आतापर्यंत 12 बैठका झाल्या आहेत. जीएसटी लागू झाल्यानंतर अधिकारांचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल असे अरुण जेटली यांनी सांगितले.
काँग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी जीएसटीवर बोलताना टीका केली आहे. भारतात अनेक कर आहेत. एक देश, एक कर ही केवळ दंतकथा आहे. जे तुम्ही आज आणले त्याला गेमचेंजर म्हणता येणार नाही ते फक्त एक छोटे पाऊल आहे अशा शब्दात मोईलींनी टीका केली. जीएसटीच्या अंमलबजावणीला उशिर झाल्याने मागच्या आठवर्षात देशाच्या तिजोरीचे 12 लाख कोटींचे नुकसान झाले आहे असे ते म्हणाले.