चलनामध्ये आल्या १२ लाख नव्या नोटा

By admin | Published: March 11, 2017 12:05 AM2017-03-11T00:05:14+5:302017-03-11T00:05:14+5:30

नोटाबंदीनंतर सुमारे १२ लाख नव्या नोटा रिझर्व्ह बँकेने चलनात आणण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली.

1.2 lakh new currency in circulation | चलनामध्ये आल्या १२ लाख नव्या नोटा

चलनामध्ये आल्या १२ लाख नव्या नोटा

Next

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर सुमारे १२ लाख नव्या नोटा रिझर्व्ह बँकेने चलनात आणण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली.
जेटली यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, २४ फेब्रुवारी २0१७ पर्यंत ११,६४,१00 नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या. हा आकडा आता १२ लाख झाला असेल. कारण ही माहिती मिळून आता १५ दिवस झाले आहे.
एका पुरवणी प्रश्नावर उत्तर देताना अर्थमंत्री जेटली म्हणाले की, चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे आणि हजारांच्या किती नोटा बँकांत जमा झाल्या, याचा निश्चित आकडा या घडीला देणे अवघड आहे. बँकेत जमा झालेली प्रत्येक नोट खरी आहे की खोटी हे तपासून पाहावे लागणार आहे. त्यानंतर खऱ्या आणि बनावट नोटा वेगळ््या कराव्या लागतील. हे मोठे काम आहे. त्यामुळे आताच काही सांगणे कठीण आहे. रिझर्व्ह बँकेने ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आम्ही यासंबंधीचा तपशील सभागृहात देऊ.
नोटा छापण्याचा खर्च किती यासंबंधीच्या प्रश्नावर अरुण जेटली यांनी सांगितले की, छपाईसाठी वापरले जाणारे साहित्य आणि मजुरी यामुळे हा खर्च दरवर्षी बदलत असतो. सध्या पाचशेची नोट छापायचा खर्च २.८७ ते ३.0९ रुपये इतका आहे. दोन हजारांच्या नोटेचा छपाई खर्च ३.३४ ते ३.७७ रुपये आहे. २ हजारांच्या नोटेचा खर्च एक हजाराच्या नोटेएवढाच आहे. मात्र एक हजार रुपयाच्या नोटा छापणे ८ नोव्हेंबर २0१६ नंतर बंद करण्यात आले
आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
करवसुलीची माहिती देताना अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, गेल्या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत प्रत्यक्ष करांची वसुली १,४0,८२४ कोटी रुपये होती. आदल्या वर्षी हा आकडा १,३५,६६0 कोटी रुपये होता.

Web Title: 1.2 lakh new currency in circulation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.