भारतात येत्या २० वर्षांत १२ कोटी मधुमेही

By admin | Published: April 7, 2017 04:54 AM2017-04-07T04:54:25+5:302017-04-07T04:54:25+5:30

भारतात येत्या २० वर्षांत मधुमेहींची संख्या १२ कोटींपर्यंत जाणार आहे. सध्या ही संख्या सात कोटी (७० दशलक्ष) आहे

12 million diabetics in India in the next 20 years | भारतात येत्या २० वर्षांत १२ कोटी मधुमेही

भारतात येत्या २० वर्षांत १२ कोटी मधुमेही

Next


हैदराबाद : भारतात येत्या २० वर्षांत मधुमेहींची संख्या १२ कोटींपर्यंत जाणार आहे. सध्या ही संख्या सात कोटी (७० दशलक्ष) आहे, असे इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ पब्लिक हेल्थने (आयआयपीएच) म्हटले. प्रत्येक मधुमेही आपला आजार व त्यामुळे होणारी गुंतागुंत नियंत्रणात राखण्यासाठी दरवर्षी सरासरी २५ हजार रुपये खर्च करतो, असे येथील आयआयपीएचचे संचालक जीव्हीएस मूर्ती यांनी गुरुवारी सांगितले. सात एप्रिल या जागतिक आरोग्य दिनानिमित्त ते बोलत होते.
673 अब्ज डॉलर एवढा खर्च मधुमेहामुळे जगभरात दरवर्षी होतो आहे. सरकारच्या तसेच वैयक्तिक पातळीवरील खर्च वाढला आहे. 50% मूर्ती यांच्या म्हणण्यानुसार, मरण पावणाऱ्या प्रौढांतील ५० टक्के हे मधुमेहाचे बळी असतात.
>भारतात किती येतो खर्च?
भारतात एका मधुमेहीला या आजाराचे व्यवस्थापन करण्यास वर्षाला अंदाजे सरासरी २५ हजार रुपये खर्च येतो. त्या रुग्णाला या आजारामुळे आणखी काय काय आरोग्यविषयक तक्रारी आहेत, त्यानुसार या खर्चामध्ये बदल होतात. भारतात दुर्दैवाने मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी होणाऱ्या खर्चाला विम्याचे छत्र उपलब्ध नाही, असे मूर्ती म्हणाले.
आयुष्यभर औषधोपचार
मधुमेहीला आयुष्यभर औषधोपचार घ्यावे लागतात. मधुमेह नियंत्रणात राहिला नाही तर डोळे, मूत्रपिंड असे अत्यंत महत्वाचे अवयव बाधित होऊ शकतात. त्यामुळे रुग्णांना आधीच त्याबद्दलचे धोके व औषधोपचार सांगितला गेला पाहिजे, असे जीव्हीएस मूर्ती यांनी म्हटले.

Web Title: 12 million diabetics in India in the next 20 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.