बस अपघातात १२ विद्यार्थी ठार

By admin | Published: January 20, 2017 05:51 AM2017-01-20T05:51:33+5:302017-01-20T05:51:33+5:30

शालेय बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन १२ विद्यार्थी आणि त्यांचा बसचालक असे १३ ठार

12 students killed in a bus accident | बस अपघातात १२ विद्यार्थी ठार

बस अपघातात १२ विद्यार्थी ठार

Next


एटा (उत्तर प्रदेश) : शालेय बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन १२ विद्यार्थी आणि त्यांचा बसचालक असे १३ ठार तर ३५ मुले जखमी झाली. उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यात गुरुवारी हा भयंकर अपघात घडला. दाट धुक्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज आहे.
जिल्हाधिकारी शंभू नाथ यांनी यापूर्वी १५ मुले ठार झाल्याचे म्हटले होते. तथापि, नंतर अधिकाऱ्यांनी मृतांची संख्या १३ असल्याचे स्पष्ट केले. अलिगंज-पलियाली रस्त्यावरील असदनगर गावाजवळ ही दुर्घटना घडली. या बसमध्ये जे.एस. विद्यानिकेतनचे विद्यार्थी होते. २० जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी एटा, सैफेई आणि अलीगड येथे तर काहींना स्थानिक रुग्णालयांत दाखल करण्यात आले. मृतांत ५ ते १५ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या वाहनाला मोठा अपघात होण्याची राज्यातील ही अलीकडची दुसरी घटना आहे. यापूर्वी भदोही जिल्ह्यात रेल्वेने स्कूल व्हॅनला उडविल्यामुळे ८ विद्यार्थी ठार तर १४ जण जखमी झाले होते.
अपघाताचे वृत्त समजताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याची देखरेख केली, असे नाथ यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाळकरी मुलांच्या मृत्यूबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही मुलांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले. जखमींना योग्य उपचार मिळतील याची खबरदारी घेण्याच्या सूचना यादव यांनी दिल्या.
।बस उलटून २५ जखमी
जयपूर : राजस्थानात शालेय बस उलटून २५ विद्यार्थी जखमी झाले. चुरू जिल्ह्यात गुरुवारी ही दुर्घटना घडली. ही बस छोटेगाव येथून राडेलसर येथे जात होती. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ती उलटली, असे पोलीस प्रवक्त्याने सांगितले. जखमी विद्यार्थ्यांना स्थानिक रुग्णालयात, तर गंभीर जखमींना चुरू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किरकोळ जखमींना प्रथमोपचारानंतर घरी जाऊ देण्यात आले. जखमींत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बसचालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
।शाळेची मान्यता रद्द
तीव्र थंडीमुळे आठवीपर्यंतच्या शाळा शुक्रवारपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. तथापि, जे.एस. विद्यानिकेतनचा व्यवस्थापक आणि मुख्याध्यापकाने या आदेशाची पायमल्ली करून शाळा सुरू ठेवली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश दिले असून शाळा व्यवस्थापकाविरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 12 students killed in a bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.